UPTET 2021 EXAM : पेपर लीक झाला आणि यूपी टीईटी झाली रद्द

UPTET 2021 EXAM : पेपर लीक झाला आणि यूपी टीईटी झाली रद्द

उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेच्या नवीन तारखेची घोषणा झाली आहे. कारण या परीक्षांचे पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच यूपी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच UPTET परीक्षेचा पेपर फुटल्याची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवरून पेपर फुटल्याची ही बाब समोर आली आहे. यापूर्वीही अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. यामध्ये IIT प्रवेश परीक्षा, NEET, हरियाणा पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा यांचा समावेश आहे.ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळजवळ २१ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. असे सांगितले जात आहे की, पेपर लीक झाल्याने आता एका महिन्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. याप्रकरणी काही आरोपींनासुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.


कर्नाटक लोकसेवा आयोगाने (KPSC) प्रथम श्रेणी सहाय्यकाचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा २४ जानेवारीला होणार होती. याप्रकरणी सहा जणांना अटकही करण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारी महिन्यात जनरल ड्युटी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी बारामती, पुणे येथून तीन जणांना अटक करण्यात आले.

याशिवाय बिहार बोर्डाचा दहावीचा सामाजिक शास्त्राचा पेपर १९ फेब्रुवारीला लीक झाला होता. पेपर फुटल्यानंतर बीएसईबीने पहिल्या शिफ्टमध्ये घेण्यात आलेली परीक्षा रद्द केली. सप्टेंबर महिन्यात पंजाब बोर्डाच्या इयत्ता ६ ते १२ वीचा पेपर फुटल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने हे प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.


हे ही वाचा – Omicron Variant: WHO ने ओमिक्रॉनचा Risk Factor केला स्पष्ट, दिला महत्वाचा इशारा


 

First Published on: November 29, 2021 6:35 PM
Exit mobile version