mix match covid vaccine : अमेरिकेत फायझर, मॉर्डन आणि J&J लसींच्या booster डोसला परवानगी

mix match covid vaccine : अमेरिकेत फायझर, मॉर्डन आणि J&J लसींच्या booster डोसला परवानगी

mix match covid vaccine : अमेरिकेत फायझर, मॉर्डन आणि J&J लसींच्या booster डोसला परवानगी

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) बुधवारी कोरोनाविरोधी लसीच्या बूस्टर डोसला अर्थात लसींच्या मिक्स अँड मॅच डोसला परवानगी दिली आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत आणि ज्यांना बूस्टर डोसची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मिक्स बूस्टर डोस मिळणार आहे. डेल्टा विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे बूस्टर डोसला मान्यता दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्यांना लसीचा तिसरा डोस मिळणार आहे.

अमेरिकेत सध्या फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन लसींच्या वापराला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला लसीचे दोनही डोस देण्यात आले असतील तर ठरावीक काळानंतर त्याला बुस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. कारण सिंगल लसीच्या बुस्टर डोसपेक्षा मिक्स लसीच्या बुस्टर डोस अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे एफडीएने म्हटले आहे.

एफडीएच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना सुरुवातीला मॉडर्ना लसीचे दोन डोस मिळाले आहेत आणि त्यांचे वय ६५ पेक्षा जास्त किंवा १८ वर्षांपेक्षा अधिक आहेत आणि ते उच्च जोखमीवर आहेत त्यांना आता बूस्टर डोस मिळू शकतो.

यामुळे सर्व वयस्कर नागरिक ज्यांनी दोन महिन्यांपूर्वी किंवा त्यापेक्षाही आधी J&J लसीचा एक डोस मिळाला आहे. असे सर्व नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत. यापूर्वी फक्त फाइजर लस घेतलेल्या सर्वात वयस्कर आणि अधिक जोखीम असलेल्या नागरिकांनाच बूस्टर डोससाठी परवानगी देण्यात आली होती.

दरम्य़ान दोन दिवसांपूर्वी आयसीएमआरने भारतात मिक्स अँड मॅच लसीकरणार परवानगी दिली होता. दोन्ही लसीच्या मिश्रणाने लसीचा परिणामकारकता वाढते असा निष्कर्ष आयसीएमआर आणि यूएस एफडीएच्या अभ्य़ासा दिसू आहे होते. त्यामुळे अमेरिकेच्या आधी भारतात मिक्स अँड मॅच लसीच्या वापराला परवानगी दिली आहे.

भारताने आता १०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे. त्य़ामुळे मिक्स अँड मॅच डोसच्या मंजुरीनंतर भारतात लसीकरणाला आणखी वेग येईल. कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींच्या मिक्स अँड मॅच डोसचा परिणाम अधिक प्रभावी असून त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ‘मिक्स अँड मॅच’ डोसला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे.

याआधीच्या एका अभ्यासात आयसीएमआरने की, कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होतो. असं स्पष्ट केले होते.


 

First Published on: October 21, 2021 12:47 PM
Exit mobile version