COVID-19 vaccines: Pfizer, Moderna लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका! अमेरिकेने घेतला आढावा

COVID-19 vaccines: Pfizer, Moderna लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका! अमेरिकेने घेतला आढावा

Pfizer, Moderna

कोरोनाची लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका वाढण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रांच्या सल्लागाराने बैठक घेतली. यामध्ये आतापर्यंत नोंदवलेल्या घटनांचे विश्लेषण करण्यात आले. तसेच त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांकडेही लक्ष दिले गेले आहे. अमेरिकेत १२०० हून अधिक रूग्ण अशी आढळली आहेत की, ज्यांना फाइजर आणि मॉडर्ना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास झाला आहे. यामध्ये तरुणांचादेखील सहभाग होता. अमेरिकेत मायोकार्डिटिस आणि पेरिकार्डिटिसची प्रकरणे समोर आली आहेत. अमेरिकेत विशेषतः तरूणांमध्ये अशी प्रकरणे अधिक असल्याचे समोर आले आहे.

इम्‍यूनाइझेशन प्रॅक्टिसवरील सीडीसी सल्लागार समितीच्या बैठकीत सेफ्टी ग्रुपचे प्रमुख ग्रेस ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणानंतर मायोकार्डिटिसच्या प्रकरणांची नोंद करण्यात आले हे उल्लेखनीय आहे. त्यांच्या मते, लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर आठवड्यांनी अशी प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये छातीत दुखण्याची तक्रार खूप सामान्य असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांनी असेही सांगितले की, सिन्हुआच्या अहवालानुसार सीडीसी अधिकारी अधिक डेटा गोळा करण्याचे काम करत आहेत. यासह ते हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की, हा धोका किती काळ राहू शकतो? याचा कोणाला किती धोका आहे? आणि हा धोका दीर्घकाळ राहिला तर तो कसा बरा करता येईल?

अमेरिकेत आतापर्यंत नोंदवलेल्या रूग्णांनुसार, मॉडर्ना व्हॅक्सीनच्या एकाच डोसनंतर मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिसची २६७ रूग्ण तर दुसऱ्या डोसनंतर ८२७ रूग्णांची नोंद झाली आहे. सीडीसीच्या मते, अशा प्रकारच्या १३२ घटनांकडेही लक्ष दिले जात आहे, ज्यांना आतापर्यंत लसीची किती डोस दिले गेले आहे. मात्र अद्याप याची माहिती समोर आलेली नाही. यापैकी बहुतेक रूग्ण हे पुरुष असल्याचे सांगितले जात आहेत.


First Published on: June 24, 2021 3:02 PM
Exit mobile version