अमेरिकेला मिळणार नवा राष्ट्राध्यक्ष?; जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

अमेरिकेला मिळणार नवा राष्ट्राध्यक्ष?; जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे कारण अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विजयासाठी उमेदवाराला २७० मतांची आवश्यकता आहे. मतमोजणी सुरु असून जो बायडन यांना २६४ इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. बायडन यांना केवळ ६ मतांची गरज आहे. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर आहेत. ट्रम्प यांना केवळ २१४ इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातली स्विंग स्टेट्समधली स्पर्धा चुरशीची झालेली आहे. एकीकडे ट्रम्प यांनी जिंकल्याचा दावा करत, निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असणाऱ्या जो बायडन यांनीही आपण विजयपथावर असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात अजूनही लाखो मतपत्रिकांची मोजणी होणे शिल्लक असून सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनुसार ट्रम्प चार राज्यांमध्ये आघाडीवर आहेत.

अमेरिकेत सत्तांतर होण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांना विजयासाठी केवळ ६ मतांची आवश्यकता आहे. बायडन यांना २६४ इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. दरम्यान, निकालापूर्वीच बायडन यांनी विक्रम केला असून ओबामा यांचा विक्रम मोडत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळावणारे उमेदवार बनले आहेत.

 

First Published on: November 5, 2020 10:05 AM
Exit mobile version