Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री; दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण

Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री; दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण

Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री; दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आतापर्यंत २५ देशांमध्ये पसरला आहेत. आता कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने अमेरिकेत एंट्री केली आहे. काल, बुधवारी व्हाईट हाऊसने नव्या व्हेरिएंटबद्दल माहिती देताना सांगितले की, अमेरिकेत ओमिक्रॉनची लागण झालेल्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन पसरलेल्या देशाची संख्या आता २५वर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन व्हेरिएंट २३ देशांमध्ये पसरल्याचे सांगितले होते.

दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आढळल्यापासून वैज्ञानिक सातत्याने अध्ययन करत आहेत. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व देश सतर्क झाले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने गेल्या महिन्याच्या अखेरीस आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती.

अमेरिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचा रुग्ण हा कॅलिफोर्नियातील आहे. तो २२ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेहून संयुक्त राज्य अमेरिकामध्ये परतला होता. सात दिवसानंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माहितीनुसार त्याचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. याबाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी म्हणाले की, अमेरिकेत ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे दिसली असून त्यामध्ये सुधारणा होत आहेत.

दरम्यान अमेरिकेत पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर व्हाईट हाऊसने अमेरिकन नागरिकांना कोरोना लस आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – omicron : सौदी अरेबियामध्ये ओमिक्रॉनची दहशत, आढळला पहिला रुग्ण


 

First Published on: December 2, 2021 8:35 AM
Exit mobile version