Corona Vaccination: कोरोना लस घ्या अन् जिंका १० लाख रुपये!, ते कसे, कुठे? जाणून घ्या

Corona Vaccination: कोरोना लस घ्या अन् जिंका १० लाख रुपये!, ते कसे, कुठे? जाणून घ्या

कोरोना महामारीला थोपविण्यासाठी जगातील अनेक सरकार लोकांना सातत्याने लस घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त लोकं स्वतः सुरक्षित राहतात असे नाही तर व्हायरसला रोखण्यासाठी देखील मदत करतात. दरम्यान अमेरिकेतील अनेक शहरात लसीकरण वेगाने सुरू आहे. त्यामागचे कारण ही तितकच महत्त्वाचे आहे. अमेरिकेत काही शहरांमध्ये लस घेतल्यावर लोकांना मोफत बेसबॉल गेमची तिकिट, बियर, फ्रेंच फ्राइज आणि एवढेच नाहीतर मोफत गांजा देखील उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु अमेरिकेच्या ओहायो शहरात कोरोना लस घेतल्यानंतर लोकं १० लाख रुपये जिंकू शकतात. हे कसे काय? त्याबाबत पुढे जाणून घ्या

या शहरातील राज्यपालांनी ट्वीट करून याबाबत घोषणा दिली आहे. माइक ड्वीन यांनी आपल्याला ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘२६ मे पासून कोरोना व्हायरस रिलीफ फंड्समधून लॉटरीची घोषणा करत आहे. या लॉटरीसाठी असे लोकं पात्र असतील, ज्यांनी कोरोना लसीचा एकतरी डोस घेतला असेल.

त्यांनी आपल्याला ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, ‘या लॉटरीचा ड्रा प्रत्येक आठवड्यात बुधवारी काढला जाईल. पुढील ५ आठवड्यासाठी ही लॉटरी असेल. प्रत्येक लॉटरी विजेत्याला १० लाखांचे बक्षिस दिले जाईल. अशाप्रकारे कोरोना रिलीफ फंडातून ५० लाख दिले जातील. यामुळे अनेक लोकं कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहित होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान ओहायोमध्ये लस घेण्यासाठी लॉटरी कल्पना सुरू केली असली तरी यापूर्वी इतर राज्यांनी आणि स्थानिक सरकारने लोकांना लस घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्याची सुरुवात केली होती. वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यपाल जिम जस्टिस यांनी गेल्या आठवड्यात याबाबत घोषणा केली होती. ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनी जर लस घेतली तर त्यांना १०० डॉलर्स सेव्हिंग्स बाँड प्रदान केले जाईल, अशी जिम यांनी अशी घोषणा केली होती. शिवाय जॉर्जिया शहराच्या प्रशासनाने यावर्षी जानेवारी महिन्यात घोषणा केली होती की, ‘शहरातील लोकांनी एकदा कोरोना लस घेतली तर त्यांना वॉल-मार्टचे २०० डॉलर्सचे गिफ्ट कार्ड्स दिले जाईल.’


हेही वाचा – गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार


 

First Published on: May 14, 2021 6:26 PM
Exit mobile version