करोनाच्या भितीने रुग्णालयातून ७०० डॉक्टर गायब

करोनाच्या भितीने रुग्णालयातून ७०० डॉक्टर गायब

चीनमधील वुहान शहरातून भारतात पोहचलेल्या करोना व्हायरसने सामान्य नागरिकांसह डॉक्टरांनाही हादरवून टाकले आहे. हे अधोरेखित करणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघून येथील विविध रुग्णालयातील डॉक्टरांना खास प्रशिक्षण देण्यात आले.  मात्र करोनाच्या संसर्गाला घाबरून हे डॉक्टरच गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांना याबद्दल विचारता काहीजणांनी आजारी असल्याबरोबरच पुढील उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याची कारणे सांगितली. यामुळे कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहणाऱ्या या डॉक्टरांना निलंबित करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.

भारतात करोनाची लागण झालेला पहीला रुग्ण आढळताच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवण्याचा आदेश राज्यांना देण्यात आला होता. यापाार्श्वभूमीवर सर्वच राज्ये कामालाही लागले. उत्तर प्रदेश सरकारनेही प्राधान्य घेत करोना सारख्या व्हायरसचा सामना कसा करायचा रुग्णांवर उपचार काय करायचा यासह तो पसरणार नाही याची काळजी कशी घ्यायची याबद्दल विविध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. पण ज्या केंद्रावर या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे तेथे गेले अनेक दिवस एकही डॉक्टर फिरकला नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या उत्तर प्रदेश सारकारने या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशमद्ये करोनाबरोबर लढण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोग्य विभागाला दिले होते. त्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. पण करोनाचा वाढता संसर्ग बघून या डॉक्टरांनीच रुग्णालयातून पळ काढला. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहीला आहे.

First Published on: March 16, 2020 7:27 PM
Exit mobile version