महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार; २५ हजारचं बक्षीस

महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार; २५ हजारचं बक्षीस

महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार; २५ हजारच बक्षीस

तक्रारदार महिलेसमोर अश्लील चाळे करणारा आरोपी पोलीस निरीक्षक फरार झाला असल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या आरोपीला शोधल्यास किंवा त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला २५ हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे देवरिया पोलीस अधीक्षकांनी त्याबाबत माहिती दिली आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील अमवा तिवारी गावातील एक तरुणी आपल्या आईसोबत जमिनीच्या वादासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार, तेथील पोलीस अधिकारी भीष्मपाल सिंह यादव याच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्यानी परवानगी दिल्यानंतर पीडिती समोरच्या खुर्चीवर बसली. त्यानंतर तिने आपल्या जमिनीच्या वादासंबंधी माहिती देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी यादव यानी पीडितीसमोर हस्तमैथुन केले. या घटनेचा तरुणीने व्हिडीओ काढला आणि घरी निघून गेली. त्यानंतर त्या तरुणीने हा व्हिडीओ आपल्या शेजारच्यांना दाखवला आणि त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि ही घटना पोलीस ठाण्यापर्यंत गेली. त्यानंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी यादव याच्याविरोधात भटनी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान, यादवबद्दल माहिती दिल्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले. आरोपी यादव याला चार दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.


हेही वाचा – जेवढा कोरोना वेगाने पसरतोय, तेवढा चीनवर माझा राग वाढतोय- ट्रम्प


 

First Published on: July 1, 2020 3:56 PM
Exit mobile version