अजबच; उत्तर प्रदेशमध्ये माकडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अजबच; उत्तर प्रदेशमध्ये माकडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेश राज्यात सर्वांना आश्चर्यचकित करेल अशी घटना घडली आहे. बागपत जिल्ह्यातील तिकरी नावाच्या गावात धर्मपाल सिंह या ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माकडांच्या माकडचाळ्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी त्या माकडांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत कुटुंबायींच्यावतीने करण्यात आली आहे. तिकरी गावात १७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी राजीव प्रताप सिंह यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, धर्मपाल सिंह विटांच्या ढिगाऱ्याजवळ झोपले होते. त्यावेळी तेथे आलेल्या माकडांनी विटांचा ढिगारा धर्मपाल यांच्या अंगावर पाडला. यात धर्मपाल जखमी झाले असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा – अबब! १८ वर्षात तिने दिला ४४ बाळांना जन्म

या घटनेची दुसरी बाजू सांगताना धर्मपाल यांचे भाऊ कृष्णपाल सिंह म्हणाले की, धर्मपाल घरातील पुजेसाठी लाकडे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर माकडांनी हल्ला केला. माकडांनी धर्मपाल यांच्यावर विटा फेकून मारल्यामुळे धर्मपाल यांच्या डोक्याला आणि छातील मार लागला. या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माकडांवर गुन्हा दाखल करुन घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्यांची ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली आहे.

पोलिसांनी धर्मपाल यांच्या मृत्यूला अपघात असल्याचे म्हटले आहे. मात्र कृष्णपाल यांचे त्यावर समाधान झालेले नाही. आम्ही वरीष्ठ अधिकाऱ्यांना भेटून पुन्हा एकदा आमची मागणी लावून धरू अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

हे माहित आहे का – ‘ही’ जीन्स घाला आणि पोटातला गॅस बिनधास्त सोडा!

First Published on: October 21, 2018 3:31 PM
Exit mobile version