Election Result 2022 : युपी, गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर, तर पंजाबमध्ये आपकडून काँग्रेसला धक्का

Election Result 2022 : युपी, गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर, तर पंजाबमध्ये आपकडून काँग्रेसला धक्का

UP Election Result 2022 : यूपीत समाजवादी पार्टीचा आकडा १०० च्या पार, भाजपचा बहुमताच्या दिशेने प्रवास, पाहा कोण आघाडीवर?

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज (गुरूवार) हाती येत आहेत. सध्या निवडणुकीची परिस्थिती पाहिली असता उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने २०० पेक्षा अधिक जागांवर मुसंडी मारली होती. तर गोव्यामध्ये १६ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे आणि उत्तराखंडमध्ये ३५ पेक्षा अधिक जागांवर भाजप तर काँग्रेस २० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पार्टी ८० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे.

पंजाबमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये आपने ४५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस १७ तर भाजप १४ जागांवर आघडीवर असल्याचं दिसत आहे. उत्तराखंडमध्ये ३५ पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेसने २० जागांवर मुसंडी मारली आहे. मणिपूरमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता काँग्रेस आतापर्यंत कलांमध्ये आघाडीवर आहे.

देशामध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये यूपीमध्ये सात टप्पात मतदान झाले होते. त्याठिकाणी ४०३ हून अधिक जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पार्टी ऐकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. त्यामुळे यूपीमध्ये कोणता पक्ष आणि नेता मुसंडी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी ३ मार्चला मतदान झालं.


हेही वाचा : EVM Tampering in UP : ईव्हीएम छेडछाड अशक्य, मुख्य निवडणूक आयुक्तांची EVM चोरीवर प्रतिक्रिया


 

First Published on: March 10, 2022 10:31 AM
Exit mobile version