Assembly Election 2022: मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं ट्वीट; म्हणाले, मतदान करून बनवा नवा रेकॉर्ड

Assembly Election 2022: मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं ट्वीट; म्हणाले, मतदान करून बनवा नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज पाच राज्यांपैकी तीन ठिकाणी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या जागेसाठीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आणि उत्तराखंड- गोव्यातील सर्व विधानसभा जागेवरील मतदानाला सुरुवात झाली आहे. आजच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून मतदान करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासोबत आज उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागेसाठी मतदान आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, लोकशाहीच्या या पवित्र उत्सवाचे भागीदार व्हा आणि मतदानाचा नवा रेकॉर्ड बनवा. त्यामुळे आधी मतदान, मग बाकी काम, हे लक्षात ठेवा,’ असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

 

दंगलमुक्त आणि भयमुक्त नव्या उत्तर प्रदेशासाठी मतदान करा – मुख्यमंत्री योगी

‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२च्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारांचे हार्दिक अभिनंदन! मतदानाचा हक्क आणि कर्तव्यासोबतच ‘राष्ट्रधर्म’ही आहे. दंगलमुक्त आणि भयमुक्त नवा उत्तर प्रदेश विकास यात्रा सुरू ठेवण्यासाठी मतदान नक्की करा,’ असे आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून मला शुभेच्छा दिला. मला पूर्व विश्वास आहे की, भाजप २२+ जागा जिंकेल. भाजपने १० वर्षात पायाभूत सुविधांचा विकास केला असून पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर दृष्टीचा आम्हाला १०० टक्के बहुमताचा नक्की फायदा होईल,’ असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्यातील ४० जागांसाठी ३०१ उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ६४ हजार ५२२ मतदारांच्या हाती आहे. उत्तराखंडमधील ७० जागांसाठी चुरशीची लढत होत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये दुसर्‍या टप्प्यात ५५ जागांसाठी ५८६ मतदारांचे भवितव्य २कोटींहून अधिक मतदारांच्या हाती आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख चेहरांमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री राहिलेले धर्म सिंह सैनी यांचा समावेश आहे, जे भाजप सोडून सपामध्ये गेले होते. आजम खान यांना त्यांचा गड रामपूर जागेवरून मैदानात उतरवले गेले आहे. तर सैनी नकुड विधानसभा क्षेत्रातून आपले नशीब आजमावणार आहेत. तसेच आजम खान यांचे सुपुत्र अब्दुल्ला आजम यांना स्वार जागेवरून मैदानात उतरवले आहे.


हेही वाचा – Goa Election 2022 : आदित्य ठाकरेंनी आधी इतिहास जाणून घ्यावा, देवेंद्र फडणवीसांचा टोला


 

First Published on: February 14, 2022 8:15 AM
Exit mobile version