धक्कादायक: छेडछाडीला विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळलं

धक्कादायक: छेडछाडीला विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळलं

वर्ध्यात तरूणीला जाळण्याचा प्रयत्न

उत्तरप्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्यामुळे विवाहीत महिलेला जिवंत जाळले. उत्तरप्रदेशच्या सीतापूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये महिला ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पीडित महिला काही दिवसांपूर्वी शैचालयासाठी शेतामध्ये जात होती दरम्यान गावामधील काही तरुणांनी तिला जबरदस्ती उसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने आरडाओरडा करुन विरोध केला. दरम्यान आरोपींनी तिथून पळ काढला.

अशी घडली घटना

घाबरलेल्या महिलेने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. दरम्यान तिच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आरोपीविरोधात काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे आरोपींची हिम्मत आणखी वाढली. त्यांनी पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे आरोपींनी बदला घेतला. महिला शौचालयाला जात असताना तिच्यावर मागे येऊन त्यांनी हल्ला केला. महिलेच्या अंगावर तेल टाकून तिला पेटवून दिले.

आरोपींना अटक

याआगीमध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. महिला ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

First Published on: December 3, 2018 5:11 PM
Exit mobile version