Uttarakhand Election 2022: उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदानाला सुरूवात, ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांचे ठरवणार भवितव्य

Uttarakhand Election 2022: उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदानाला सुरूवात, ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांचे ठरवणार भवितव्य

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी मतदान होणार असून ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मतदानासाठी ११ हजार ६९७ इतकी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान, कोविड-१९ च्या नियमांची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

७० विधानसभा मतदारसंघासाठी किती उमेदवार?

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील ८२ लाखांहून अधिक मतदार आपल्या उमेदवारांना निवडून देणार आहेत. ७० विधानसभा मतदार संघासाठी ६३२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १५५ उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मतदानासाठी आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. तसेच कोविड-१९ च्या नियमांचे पालन देखील काटेकोर पद्धतीने केले जाणार आहेत. महिला मतदारांच्या सोयीसाठी राज्यात १०० हून अधिक महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

कधी लागणार निकाल?

राज्यातील सर्व विधानसभा जागांसाठीचा प्रचार शनिवारी संपला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यतिरिक्त भाजपच्या अनेक दिग्गजांनी प्रचार केलाय. काँग्रेसच्या वतीने प्रियांका गांधी यांनीही जाहीर सभेमध्ये जनतेला संबोधित केलंय. तसेच आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही राज्यातील सर्व मतदारांनी आवाहन केले आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला संधी देण्यास सांगितली होती. राज्यातील सर्व जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. तसेच विधानसभेचा निकाल म्हणजेच परीक्षेचा निकाल हा १० मार्च रोजी येणार आहे.

या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

उत्तराखंडमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा कर्नल (निवृत्त) अजय कोठियाल यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील बूथ क्रमांक-78 जोशीदा येथे मतदान केले.

उत्तराखंडमध्ये आपच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा असणारे कर्नल अजय कोठियाल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील बूथ क्रमांक – ७८ जोशीदा येथे मतदान केले आहे. खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी त्यांच्या मुलीसह डेहराडूनमधील हाथी बडकला केंद्रीय विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला आहे.

First Published on: February 14, 2022 8:54 AM
Exit mobile version