Uttarakhand Elections 2022: उत्तराखंडचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेनही, अमित शाहांना हरीश रावत यांचे प्रत्युत्तर

Uttarakhand Elections 2022: उत्तराखंडचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेनही, अमित शाहांना हरीश रावत यांचे प्रत्युत्तर

Uttarakhand Elections 2022: उत्तराखंडचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेनही, अमित शाहांना हरीश रावत यांचे प्रत्युत्तर

उत्तराखंडच्या ७० जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांची भवितव्य ठरवणार आहेत. उतराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यादरम्यान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश राव त्यांच्या एका वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या ‘धोबी का… न घर का न घाट का’ या वक्तव्यावर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश राव यांनी काल, रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. जर उत्तराखंडचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेलही असे माजी मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या शब्दांचे वर्णन ‘उत्तराखंडींच्या प्रती भाजपचे वाईट विचार’ असल्याचे म्हणत हरीश रावत म्हणाले की, ‘कुत्रा हा भैरवाचा भाग मनाला जातो. जर मी त्यांच्या नजरेत कुत्रा असेल, तर मी उत्तराखंडचा आहे. उत्तराखंडसाठी फक्त बोलणार नाही तर भुंकेनही. पण लक्षात ठेवा उत्तराखंडेचे हित दुखावले तर भुंकण्यासोबत चावेनही.’

दरम्यान उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट शनिवारी अमित शाहांच्या सभेने झाला. ज्यामध्ये अमित शाहा म्हणाले होते की, ‘माजी मुख्यमंत्री रावत यांच्याबाबत त्यांच्या पक्षात संभ्रम आहे. बिचारे हरीश रावत यांना नेता बनवतील की नाही, तिकिट देणार की नाही देणार. इथून तिकीट देणार की तिथून तिकट देणार. एक धोबीचा…पुढे बोलू शकत नाही, घर का न घाट का.’

केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत रावत म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उत्तराखंडमध्ये येत आहेत आणि काँग्रेसच्या एका छोट्या कार्यकर्त्यावर टीकांची बरसात करत आहेत. शनिवारी एका सभेत शाह त्यांना थेट कुत्रा नाही म्हटले, पण त्यांची तुलना त्याच्यासोबत केली.’


हेही वाचा – Uttarakhand Election 2022: उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदानाला सुरूवात, ८२ लाख मतदार ६३२ उमेदवारांचे ठरवणार भवितव्य


First Published on: February 14, 2022 9:44 AM
Exit mobile version