Uttarakhandr Rain : उत्तराखंडात पावासाचा हाहाकार, आत्तापर्यंत १६ लोकांचा मृत्यू

Uttarakhandr Rain : उत्तराखंडात पावासाचा हाहाकार, आत्तापर्यंत १६ लोकांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडचे जवजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील नद्या, नाल्यांना महापूराचे स्वरुप आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे राज्यात आत्तापर्यंत १६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सुचना केल्या आहेत. प्रशासनाकडूनही आवश्यकत्या उपाययोजना सुरु केल्या जात आहेत.

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर आज ११ निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यावरील संकट लक्षात घेत लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता उत्तराखंडतील अनेक जिल्ह्यांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी नागरिक फसले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत कार्य वेगाने सुरु असून लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बातचीत करुन उत्तराखंडातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.

केरळमध्येही पावसाचा धुमशान

केरळमध्येही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमशान घातले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून भूस्खलनाचमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळमध्येही जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. नेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे.


 

First Published on: October 19, 2021 4:26 PM
Exit mobile version