Indian Navy Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Indian Navy Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण असलेल्यांना भारतीय नौदलात नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Indian Navy

भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी असून भारतीय नौदलाने सेलर म्हणजेच नाविका, खलाशाच्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या या पदासाठी आजपासून अर्ज करू शकतात. याकरता उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला joinindiannavy.gov.in भेट द्यावी लागेल. त्याद्वारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. २ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार या पदांसाठी ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेद्वारे, भारतीय नौदलात ३३  खलाशांच्या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर मुलाखतीसाठी साधाकण ३०० उमेदवारांना मुलाखतीकरता बोलावण्यात येणार आहे. ही भरती ऑक्टोबर २०२१ या वर्षाच्या बॅचसाठी केली जाणार आहे.

अशी आहे पात्रता

अशी असेल निवड प्रक्रिया

भारतीय नौदलात साधारण ३०० उमेदवारांना म्यूझिक टेस्ट आणि PFT साठी बोलावण्यात येणार आहे. या पदावर निवड होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेत उमेदवारांना १.६ किमी धाव ७ मिनिटात पूर्ण करावी लागणार आहे, त्यासोबतच २० बैठका आणि १० पुशअप करावे लागणार आहेत.

असा असेल पगार

सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण कालावधी दरम्यान, निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड म्हणून दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना लेव्हल ३ डिफेन्स पे मॅट्रिक्स अंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. यासह, त्यांना डीए आणि ५२०० रुपये एमएसपी देखील देण्यात येणार आहे.

First Published on: August 2, 2021 10:06 AM
Exit mobile version