covid19: तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी Vaccination पुरेसे नाही, आरोग्य तज्ञांचा अलर्ट

covid19:  तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी Vaccination पुरेसे नाही, आरोग्य तज्ञांचा अलर्ट

देशासह संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा सामना करत आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता देशात तिसऱ्या लाटेचे वारे वाहू लागले आहेत. देशात येणारी कोरोनाची तिसरी लाट पहिल्या दोन लाटेपेक्षा भयंकर असल्याचे म्हटले जात आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असतानाचा आरोग्य तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी देशात केवळ लसीकरण करणे पुरेसे होणार नाही, असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिलाय. (Vaccination is not enough to stem the third wave, health experts alert)
तज्ञांनी केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला होता की, कोरोना लसीचे दोन संक्रमित लोकांवर प्रभवी ठरू शकतो. मात्र नवीन अभ्यासानुसार, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट शरिरात तयार झालेल्या इम्युनिटीला चकवा देऊ शकतो अशी चेतावणी दिलीय. या अभ्यासानंतर लोकांना सुरक्षित राहण्यासाठी लसीकरणासोबतच अतिरिक्त सुरक्षा देण्याची देखील गरज असल्याचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

नागरिकांना बुस्टर डोस देण्याची आवश्यकता

तिसऱ्या लाटेत सुरक्षेसाठी लोकांना लसीकरणानंतर आणखी एक बूस्टर डोस देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. रणदिप गुलेरियानी म्हटले आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस म्हणजे दोन डोस असलेली कोणतीही लस घेतल्यानंतर त्याव्यतिरिक्त आणखी तिसरा लसीचा डोस देण्याची आवश्यकता आहे. यावर तज्ञांची टीम चर्चा करत असून तज्ञांचे असे म्हणणे आहे की, बुस्टर डोस घेतल्यानंतर लोकांना लसीपासून मिळणार संरक्षण अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

बुस्टर डोसची आवश्यकता काय?

देशात कोरोना व्हायरसचे बदलते रुप सर्वांची चिंता वाढवत आहेत. कोरोना लस घेणे हे यावरचा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे. मात्र काही अभ्यासांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात लसीचे दोन डोस जास्त प्रभावी ठरू शकत नाही. हीच समस्या लक्षात घेता लसीच्या सर्वाधिक प्रभाव व्हावा यासाठी बुस्टर डोसच्या स्वरुपात तिसरी लस देण्याचा विचार करत आहेत.

कोरोनाच्या व्हेरिएंटचा विचार केला असता लसीच्या बुस्टर डोसची आवश्यकता आहे. वेळेसोबत शरिरातील प्रतिकारक शक्ती कमी होत राहते. त्यामुळे प्रत्येकाला दोन डोस घेतल्यानंतर आणखी एका डोसची गरज आहे. लसीचा तिसरा बुस्टर हा नवीन व्हेरिएंट विरोधात प्रभावशाली ठरेल. या लसीसाठी परिक्षण सुरु असल्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशात ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा ICMR ने दिला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांनी मिळवलेली प्रतिकारकशक्ती तिसऱ्या लाटेत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तिसऱ्या लाटेच्या संभाव्यतेनुसार देशातील यंत्रणांनी आपले काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – Coronavirus Vaccine : सप्टेंबरपर्यंत येणार ‘Corbevax’ ही आणखी एक स्वदेशी लस

First Published on: July 26, 2021 4:55 PM
Exit mobile version