Video: वादग्रस्त ‘राफेल’ विमानाचा फर्स्ट लूक

Video: वादग्रस्त ‘राफेल’ विमानाचा फर्स्ट लूक

राफेल विमान (सौजन्य-ANI)

‘राफेल’ विमान घोटाळ्याचं प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजतं आहे. ‘राफेल’च्या खरेदी प्रकरणावरुन  विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उद्योगपती अनिल अंबानींपर्यंत अनेकांवर निशाणा साधला आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या या राफेल विमानाचा पहिला वहिला व्हिडिओ, सध्या सोशल मिडीयवर व्हायरल होतो आहे. राफेल विमानाची निर्मीती करणाऱ्या ‘द सॉल्ट’ या कंपनीने विमानाचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. ज्या ‘राफेल’ विमान प्रकरणावरुन राजकीय तसंच औद्योगिक जगतात अक्षरश: वादळ उठवलं, त्याचाच हा व्हिडिओ पहिल्यांदाच जगासमोर आला आहे. सोशल मिडायवर राफेल प्रकरणाने जोर पकडला असताना, आता व्हिडिओही तितक्याच झपाट्याने व्हायरल होतो आहे. राफेल विमानाच्या या व्हिडिओवर जगभरातील लोकांच्या संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून राफेल घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर या मुद्यावरुन भाजपा सरकारला फैलावर धरलं आहे. ‘राफेल विमानाच्या खरेदीमध्ये घोटाळा करुन पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपतींचे खिसे भरले आहेत’, अशी टीकाही राहुल गांधींनी केली होती.


उपलब्ध माहितीनुसार, भारत एकूण ३६ राफेल विमानं फ्रान्सकडून खरेदी करणार आहे. राफेल हे एक उच्च दर्जाचे लढाऊ विमान असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे भारत खरेदी करणार असलेल्या या विमानांची निर्मीती भारतातच होणार आहे. यासंदर्भात राफेल विमानाची निर्मीती करणाऱ्या ‘द सॉल्ट’ या एव्हिएशन कंपनीने रिलायन्स कंपनीसोबत करारही केला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप ‘द सॉल्ट’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरीक ट्रॅपर यांनी फेटाळून लावले आहेत. याविषयी स्पष्टीकरण देताना ट्रॅपर म्हणाले, की ‘मी कोणत्याही राजकीय अधिकाऱ्यासाठी वा पक्षासाठी काम करत नाही.’ याशिवाय त्यांनी रिलायन्ससोबत आपला राफेल निर्मितीचा करार झाला असल्याचेही यावेळी स्पष्ट सांगतिले. विमान खरेदी करण्याचा हा करार दोन्ही देशांमध्ये स्वस्त दरात झाल्याचेही ते म्हणाले.

राफेल घोटाळ्यात उद्योगपती अनिल अंबानींचाही सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधीं यांनी केला होता. मात्र, यावर अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांकडून नुकतंच चोख उत्तर देण्यात आलं आहे. राफेल काँग्रेस सातत्याने खोटी माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रवक्त्यांनी दिले आहे. ‘काँग्रेसने पुन्हा एकदा खोटेपणाचा कळस करत तथ्यांची मोडतोड करून रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरोधात चुकीची मोहीम उघडली अाहे’, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.


सविस्तर वाचा: डासू आणि राफेलचा काहीच संबंध नाही – अनिल अंबानी

First Published on: November 13, 2018 3:09 PM
Exit mobile version