Video : अलास्कामध्ये भारतीय जवानांनी अमेरिकन सैन्यासह घेतला योगाचा आनंद

Video : अलास्कामध्ये भारतीय जवानांनी अमेरिकन सैन्यासह घेतला योगाचा आनंद

Video : अलास्कामध्ये भारतीय जवानांनी अमेरिकन सैन्यासह घेतला योगाचा आनंद

अमेरिके स्थित अलास्कामध्ये भारतीय जवानांनी ज्वाइंट बेस एल्मेंडार्फ रिचर्डसमधील बकनर फिजिकल ट्रेनिंग सेंटरमध्ये संयुक्त योगा शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय योगा प्रशिक्षकांनी अमेरिका आणि भारतीय जवानांना जवळपास १७ योगा प्रकारांसह सूर्य नमस्कार करण्याचे प्रशिक्षण दिले.

भारत-अमेरिका संयुक्त प्रशिक्षण शिबीर ‘एक्स युद्ध अभ्यास 21’ च्या 17 व्या भागादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय जवान आणि अमेरिकन सैन्य एकत्र मिळून योगा प्रशिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ संयुक्त बेस एल्मेंडार्फ रिचर्डसन, अलास्का (यूएस) येथील आहे.

अलास्कामध्ये सध्या १५ दिवसांसाठी मेगा सैन्य प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. १५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत हे सैन्य प्रशिक्षण शिबीर असणार आहे. या शिबीरात भारतीय सैन्याच्या इन्फेंट्री बटालियनमधील ३५० जवानांनी सहभाग घेतला आहे.

या शिबीराचा पहिला भाग फेब्रुवारीमध्ये बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात
आला होता. या शिबीराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील जवानांचे सहकार्य वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही सैन्यांमधील सहकार्य आणि परस्पर संबंध वाढवणे हा आहे.


 

First Published on: October 25, 2021 5:27 PM
Exit mobile version