Video: गुहेत अडकलेले १२ फुटबॉलर्स जिवंत!

Video: गुहेत अडकलेले १२ फुटबॉलर्स जिवंत!

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून १२ लहान मुलं अडकली आहेत. ही सगळी मुलं फुटबॉल खेळाडू असून ११ ते १६ वर्ष वयोगटातील आहेत. काही दिवसांपूर्वी ही मुलं आपल्या प्रशिक्षकासह गुहेमध्ये गेली होती. मात्र, बाहेर पडण्याचा अंदाज न आल्यामुळे ‘अंडर १६’ ची ही संपूर्ण फुटबॉल टीम या गुहेतच फसली. दरम्यान या मुलांचे बचावकार्य अद्याप सुरु असून, ही सर्व मुलं गुहेत जिवंत असल्याचं समोर आलं आहे. रेस्क्यु टीमने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बाराही मुलं सुखरुप असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांचे पालक आणि थायलंडमधील रहिवासी यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. बचाव टीमद्वारे टाकण्यात  व्हिडिओ सध्या स्थानिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

पाहा व्हिडिओ:

व्हिडिओ सौजन्य – द गार्डियन

मुलांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न…

दरम्यान बचाव पथकाकडून सर्व मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या आठवड्यापासूनच बचाव कार्याला सुरुवात झाली होती. मात्र, सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. पाऊस वाढत गेल्याने आलेल्या पुरामुळे गुहा १० किलोमीटरपर्यंत बंद झाली होती. मात्र, अखेर आठवड्याभर चाललेल्या शोधकार्यानंतर अखेर बचाव पथक या मुलांपर्यंत पोहचलं असून ही मुलं सुखरुप असल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. दुसरीकडे गुहेमधून पाणी काढण्यांचही कामही सुरु आहे.

गुहेत अडकलेल्यांना ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून बचाव कार्यादरम्यान एकूण २०० ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात आले आहेत. बचाव पथकाकडून गुहेत अडकलेल्या सर्वांना लवकरच बाहेर काढण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या तज्ञांचीसुद्धा बचाव कार्यात मदत घेण्यात आली आहे. दरम्यान सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक गुहेतून सुखरुप बाहेर यावेत यासाठी त्यांचे नातेवाईक आणि थायलंडवासी प्रयत्न करत आहेत.

 

First Published on: July 3, 2018 5:19 PM
Exit mobile version