ऐकावं ते नवलच! घोड्यानं चक्क कोंबडीच्या पिल्लाला खाल्ले, व्हिडीओ तुफान व्हायरल

ऐकावं ते नवलच! घोड्यानं चक्क कोंबडीच्या पिल्लाला खाल्ले, व्हिडीओ तुफान व्हायरल

ऐकावं ते नवलच! घोड्यानं चक्क कोंबडीच्या पिल्लाला खाल्ले, व्हिडीओ तुफान व्हायरल

सध्याच्या काळात समाज माध्यमांवर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काही मजेशीर आणि मुखावर हास्य आणणारे असतात तर काही व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर विश्वास ठेवणंच कठीण होऊन जाते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही दुःखही असतात. परंतु सध्या एक घोड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक घोडा कोंबडीच्या पिल्लालाच खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी तो शूट करणाऱ्यावर संतापले आहेत. मात्र काहींचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक घोड्याच्या बाजूला कोंबडी आणि तिची पिल्ले फिरत आहेत. सुरुवातीला पाहिले तर हा व्हिडीओ अगदी सामान्य असल्याचे दिसते. परंतु पुढील काही सेकंदामध्ये अचानक घडलेल्या घटनेमुळे भल्या भल्यांचे डोळे मोठे झाले असून विश्वास उडाला आहे. घोड्याच्या जवळ कोंबडी आणि तीन पिल्ले होती. त्यातील एका पिल्लाला घोडा खाऊन टाकतो. परंतु घोड्याने पिल्लाला खाल्यामुळे अनेकांचा विश्वास उडाला आहे. कारण घोडा हा शाकाहारी प्राणी आहे. परंतु त्याने पिल्लाला खाल्यामुळे अनेकांचा यावर विश्वास बसत नाही आहे.

घोड्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर nature27_12 नाव असलेल्या एका वापरकर्त्याने शेअर केला आहे. वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, घोड्याने कोंबडीच्या पिल्लाला त्याच्या आई समोर खाऊन टाकलं, इंस्टाग्रामवर या व्हिडीओला आतापर्यंत २६०० लोकांनी लाइक केलं आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीला पाहिला आहे ते अशाच विचारात पडले आहेत की, घोडा असे करु शकतो का? कारण घोड्याने केलेला प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नसल्यामुळे ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान घोड्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने त्यावर कमेंट केली आहे की, खरच घोड्याने कोंबडीच्या पिल्लाला खाले आहे का? तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, मला या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे की, अशा घटनांचा व्हिडीओ शूट करण्यामध्ये काही लोकांना आवडते. खरतर जास्तीत जास्त नेटकरी हे व्हिडीओ शूट करणाऱ्यावर संतापले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, जर व्हिडीओ काढण्यापेक्षा जर घोड्याला हटकले असते तर कोंबडीचे पिल्लू वाचले असते. तर काही लोकांनी म्हटलं आहे की, आतापर्यंत त्यांना वाटले घोडा हा शाकाहरी प्राणी आहे. परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते सुद्धा विचारात पडले आहेत.


हेही वाचा :  येत्या १ जानेवारीपासून अ‍ॅपवरून Food Delivery मिळवण्यासाठी भरावा लागणार कर !


 

First Published on: December 20, 2021 7:44 PM
Exit mobile version