अमानुषपणाचा कळस! माकडाला काळे फासून काठीने बडवले, व्हिडीओ व्हायरल!

अमानुषपणाचा कळस! माकडाला काळे फासून काठीने बडवले, व्हिडीओ व्हायरल!

प्रातिनिधीक फोटो

या लॉकडाऊनमध्ये प्राणांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या. केरळमध्ये गर्भवती हत्तीला फटाके खायला घातले त्यात हत्तीणीचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक घटना समोर आल्या. आता आणखी एक घटना समोर आली आहे. पीलीभीतच्या मेथी सैदुल्लागंज गावातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जेथे काही गावक्यांनी माकडाला पकडले. प्रथम वानरला हिंसक मारहाण केली गेली. मग ते काळ्या  रंगाने पेंट केले गेले. माकडाबरोबर झालेल्या या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की माकडाला दोरीने बांधलेले होते आणि मान दाबली गेली होती. तो धावण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु त्याला धावायला जमत नव्हते. लोक त्याला सतत त्रास देत असतात आणि माकडाचा हा प्रकार बघून उपस्थित लोकं मोठ्याने हसत होते. तो माकडावर काळ्या पेंट लावत राहिला. पण यावेळी माकड आपला जीव वाचविण्याकरता पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

हा व्हिडिओ दोन किंवा तीन दिवसांपूर्वीचा आहे असं म्हटलं जात आहे. १३ जुलैला हा सर्व प्रकार घडला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आणि आरोपीला अटक केली. या प्रकरणात ६ ग्रामस्थांनाही नियमांनुसार ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.


हे ही वाचा – …म्हणून कोरोनाविषयी जनजागृती करणारे बीग बींचे ते होर्डिंग्स हटवले!


 

First Published on: July 19, 2020 12:19 PM
Exit mobile version