विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी, हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी, हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी, हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होती. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये हिसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केला असून या हल्ल्यात एकुण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपालांची भेट घेऊ त्यांना हिंसाचाराबाबत निवेदन दिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान देखील पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला होता.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या २४ तासात हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारात एकुण ९ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हातावर हात ठेवून बसली आहे. पोलीस असमर्थ आहेत. यामुळे राज्यपालांना निवेदन दिले असून राज्यपालांनी आमचे निवेदन स्विकारले असल्याचे पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालमधील भटपारा येथे अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यालयासह दुकानांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी कार्यालयाची आणि दुकानांची तोडफोड केली. स्थानिकांनी या हल्लाबाबत टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केल्यामुळे तेथील ९ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकाने सांगितले आहे.

अभाविपच्या कार्यालयावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये अभाविपच्या कार्यालयावरही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यातही टीएमसीवर संशय व्यक्त केला जात आहे. अभाविपच्या कोलकता कार्यालयावर ममता बॅनर्जीच्या गुंडांनी हिंसक हल्ला केला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तृणमूल कॉंग्रेसची हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी सर्व बंगालमध्ये उघडपणे दिसून आली आहे. रविवारी (काल) पासून ममता बॅनर्जी यांचे गुंड विरोधकांवर निशाणा साधून आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यापासून ते हल्ला करण्यापर्यंत सर्व प्रकारे अराजकतेचे वातावरण निर्माण करीत आहेत. आज, तृणमूलच्या १५-२० गुंडांनी कोलकाताच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम बंगाल प्रांताच्या कार्यालयावर हल्ला केला आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना शिवीगाळ, मारहाण आणि तोडफोड केली.

First Published on: May 3, 2021 9:03 PM
Exit mobile version