अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन चिघळले, पाचहून अधिक ट्रेन पेटवल्या, तिकीट काउंटरही जाळले

अग्निपथ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन चिघळले, पाचहून अधिक ट्रेन पेटवल्या, तिकीट काउंटरही जाळले

सैन्य भरतीबाबत (army recruitment) केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या (Agneepath scheme) विरोधात बिहारमध्ये (Bihar) गदारोळ सुरू आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही बिहारच्या अनेक भागात हिंसक तरुणांच्या जमावाने पॅसेंजर गाड्या पेटवून दिल्या. रेल्वे स्थानकांचीही तोडफोड करण्यात आली. लखीसराय येथील शेकडो तरुणांनी लखीसराय रेल्वे स्थानक गाठून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. लखीसराय येथे आंदोलकांनी विक्रमशिला सुपरफास्ट ट्रेन (Vikramshila superfast train) पेटवून (train caught fire) दिली. ही ट्रेन आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) येथून भागलपूरला जात होती.

समस्तीपूरमध्येही आंदोलकांनी बिहार संपर्क एक्सप्रेस ट्रेन (Bihar Sampark Express train) पेटवली. यानंतर ट्रेनच्या चार बोग्या जळून राख झाल्या. ही ट्रेन दरभंगाहून नवी दिल्लीला जात होती. या ट्रेनची प्रचंड तोडफोड करून लुटमारही करण्यात आली.  ट्रेनला आग लावण्याची ही घटना समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनच्या भोला टॉकीज रेल्वे गुमटीजवळ घडली. यासोबतच कुऱ्हाडीया स्थानकावर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनलाही आंदोलकांनी आग लावली आहे. यानंतर पाटणा-दीनदयाळ उपाध्याय जंक्शन मेन लाईनवर जाळपोळ झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. वैशालीतील हाजीपूर रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. त्यामुळे पटनाच्या बिहिया स्थानकावर हल्लेखोरांनी जोरदार दगडफेक केली. आंदोलकांनी येथे स्टोअर रूमला आणि तिकीट काउंटरला आग लावली.

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास बरौनी हाजीपूर रेल्वे विभागाच्या मोहिउद्दीननगर स्थानकावर आंदोलकांनी लोहित एक्स्प्रेसच्या चार बोगी जाळल्या. माहिती मिळताच स्थानिक पोलीस पोहोचले असता त्यांच्या कारची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. त्यानंतर सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले आणि त्यांनी अर्धा किलोमीटर अंतरावरील स्थानक सील केलेय तसेच सर्व लोकांच्या येण्या-जाण्यास बंदी घातली. माध्यमांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

First Published on: June 17, 2022 5:44 PM
Exit mobile version