पुतिन खुश! फुटबॉल फॅन्सना वर्षभर व्हिसा शिवाय रशिया प्रवेश!!

पुतिन खुश! फुटबॉल फॅन्सना वर्षभर व्हिसा शिवाय रशिया प्रवेश!!

फोटो सौजन्य - AFP

२०१८च्या फुटबॉल विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन खुश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता फुटबॉल फॅन्सना २०१८ वर्ष संपेपर्यंत केवळ फुटबॉल फॅन्सना रशियामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी फुटबॉल फॅन्सना व्हिसा घेण्याची गरज नाही. केवळ फॅन्स आयडी असल्यास रशियामध्ये कितीही वेळी प्रवेश करता येणार आहे. २५ जुलै रोजी या फॅन्स आयडीची तारीख संपणार आहे. मात्र फुटबॉल आयडी असल्यास रशियामध्ये २०१८ वर्ष संपपर्यंत प्रवेश करता येणार असल्याची घोषणा पुतिन यांनी केली आहे. मॉस्को येथे झालेल्या फुटबॉलच्या फायनलमध्ये फ्रान्सने क्रोअशियावर ४ – २ असा विजय मिळवला. फ्रान्स आणि क्रोअशियामध्ये रंगलेला हा फायनलचा सामना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि क्रोअशियाचे अध्यक्ष कोलिंडा ग्रेबर-किटारोविक यांनी एकत्रितपणे हा सामना पाहिला. सामना संपल्यानंतर पुतिन यांनी दोन्ही राष्ट्राध्यक्षांचे आणि दोन्ही संघांचे देखील अभिनंदन केले. शिवाय रशियाच्या पंतप्रधानांनी देखील इन्स्टाग्रामवर या दोन्ही संघांचे अभिनंदन केले. सामना पाहायाला खूप मजा आली. सामना रंगतदार झाल्याची प्रतिक्रिया यावेळी पुतिन यांनी दिली. दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील ट्विटवरून फ्रान्सचे अभिनंदन केले. तसेच विश्वचषकाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल मला अभिमान वाटत असून रविवारचा फायनालचा दिवस हा आनंद देणारा होता अशी प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली आहे. तसेच फुटबॉल फॅन्सचे देखील पुतिन यांनी आभार मानले.

फ्रान्स जगतेत्ता

क्रोएशियाचा ४-२ असा धुव्वा उडवत फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. फ्रान्सने दुसऱ्यांदा असा पराक्रम केला आहे. यापूर्वी १९९८ मध्ये त्यांनी बाजी मारली होती. सामन्याच्या सुरुवातीला क्रोएशियाने फ्रान्सच्या बचावफळीवर दबाव टाकला. मात्र, १८ व्या मिनिटाला फ्रान्सला फ्री किक मिळाली, ज्यावर क्रोएशियाच्या मारिओ मांजुकीचने स्वयंगोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. याचा फायदा त्यांना २८ व्या मिनिटाला मिळाला. इवान पेरेसिचने अप्रतिम गोल करत क्रोएशियाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. यानंतर ३८ व्या मिनिटाला फ्रान्सला व्हीएआरच्या वापरामुळे पेनल्टी मिळाली. ज्यावर फ्रान्सचा स्टार ग्रीझमनने गोल करत फ्रान्सला २-१ ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फ्रान्सला मध्यंतरापर्यंत ठेवण्यात यश आले.

उत्तरार्धात फ्रान्सने चांगली सुरुवात करत ५९ व्या मिनिटाला आपली आघाडी आणखी वाढवली. पोग्बाने हा गोल केला. तर ६५ व्या मिनिटाला किलियन एम्बापेने गोल करत फ्रान्सची आघाडी ४-१ अशी केली. मात्र, क्रोएशियाने प्रतिउत्तर दिले. ६९ व्या मिनिटाला मांजुकीचने गोल करत फ्रान्सची आघाडी कमी केली. यानंतर क्रोशियाला गोल करायच्या काही संधी मिळाल्या. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले.

First Published on: July 16, 2018 11:41 AM
Exit mobile version