इस्त्रो अवकाशात पाठवणार महिला रोबोट ‘व्योममित्रा’

इस्त्रो अवकाशात पाठवणार महिला रोबोट ‘व्योममित्रा’

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान ३ बरोबरच ‘मिशन गगनयान’वर काम करण्यास सुरुवात केली आहे. या मिशन अंतर्गत २०२२ साली अंतराळात अंतराळवीरांना पाठवण्यात येणार आहे. पण त्याआधी इस्त्रो महिला रोबोट ‘व्योममित्रा’ हीला अंतराळात पाठवणार आहे.

गगनयान मिशनच्या माध्यमातून इस्त्रो पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठवणार आहे. मात्र यात जोखीम असल्याने अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याआधी अंतराळातील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी रोबो पाठवण्याचा निर्णय इस्त्रोने घेतला आहे. त्यासाठी ‘व्योममित्रा’ या महिला रोबोटची निवड करण्यात आली आहे. व्योममित्रा अंतराळात वेगवेगळे प्रयोग करणार आहे. त्यानंतर चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे. सध्या हे चारही अंतराळवीर रशियात प्रशिक्षण घेत आहेत.

First Published on: January 22, 2020 5:08 PM
Exit mobile version