क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू – सूत्र

क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू – सूत्र

जैश– ए– मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वाँटेड आंतकवादी मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या येत आहे. द लॉजिकल व्हू या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मसूद अजहर अत्यवस्थ होता. त्यातच पुलवामानंतर भारताने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. या एअर स्ट्राईकचा धक्का मसूदला बसला होता. सैनिकी इस्पितळात दाखल असताना २ मार्च रोजी मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. मात्र अद्यापही पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक होता. पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्याच्या या संघटनेची पाळेमुळे रुजलेली होती. नुकतेच पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मसूद अजहर हा पाकिस्तानात असून त्यांची तब्येत अत्यवस्थ आहे. तसेच लष्काराच्या इस्पितळात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पुलवामा हल्ल्याचा कट रचून मसदू अजहरने ४० हून अधिक सीआरपीएफ जवानांचे प्राण घेतले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे आणि काळया यादीत त्याचा समावेश करावा यासाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता.

कंधार विमान अपहरणातून सुटला होता मसूद

नेपाळच्या काठमांडू येथून दिल्ली जात असलेल्या विमानाचे १९९९ साली अपहरण करण्यात आले होते. या विमानात १८० प्रवाशी होते. या प्रवाशांच्या मुक्ततेच्या बदल्यात मौलाना मसदू अजहर, अहमद ओमर सईद शेख आणि मुश्ताक झरगर या तीन दहशतवाद्यांना सरकारने सोडून दिले होते.

First Published on: March 3, 2019 5:28 PM
Exit mobile version