विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी होणार ‘पाण्याची घंटा’

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी होणार ‘पाण्याची घंटा’

Water Bell for students to stay hydrated in school

लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जायला सुरूवात करतात तेव्हा त्यांच्या पाठीवर दप्तर आणि गळ्यात पाण्याची बॉटल असते. जरीही प्रत्येक शाळकरी मुलाकडे पाण्याची बॉटल असली तरी नियमितपणे पाणी प्यायलं जात नाही. जास्त पाणी प्यायलं तर टॉयलेटला जावं लागेल आणी शिक्षिका टॉयलेटला जायला देणार नाही या भितीमुळे विद्यार्थी जास्त पाणी पित नाही. मग कमी पाणी प्यायल्याने विद्यार्थ्यांना अनेक आरोग्याशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागताना दिसते. कमी पाणी प्यायल्यामुळे विद्यार्थ्यांना मूतखडा, यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन या सारखे त्रास होण्याची शक्यता असते. शाळकरी मुलांमध्ये यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं प्रमाण वाढत असल्याचे बालरोग तज्ज्ञांकडून केरळ सरकारला कळण्यात आले. या आरोग्याच्या समस्येवर उपाय म्हणून केरळच्या एका शाळेमध्ये ‘पाण्याची घंटा’ अशी अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

केरळमध्ये ‘पाण्याची घंटा’ ही मोहीम सुरू करण्यात आली

अशी आहे ‘ही’ मोहीम

या मोहीमेनुसार शाळेत ३-४ वेळा पाण्याची घंटा वाजवण्यात येते. ही घंटा विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास आठवण करून देते. दरम्यान ही अनोखी मोहीम ‘असोसिएशन फॉर प्रायमरी एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ (एपीएआर) या संस्थेनं हाती घेतली असून सर्वत्र ठिकाणी राबवण्याचा त्यांचा हेतू आहे. एपीएआरनं बंगळूरु, पुणे, हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबई या शहरातील काही पालकांची आणि शिक्षकांची मुलाखत घेतली आहे. तर यातील ६८ टक्के पालकांनी तक्रार केली की घरून भरून नेलेली पाण्याची बाटली, मुलं जशीच्या तशी भरलेली घरी परत आणतात. विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान २ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी न प्यायल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असं बालरोग तज्ज्ञाचं मत आहे. आतापर्यंत देशभरातून ५० शाळेंनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे, असं एपीएआरचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: भारताचा कचरा अमेरिकेत येतोय – डोनाल्ड ट्रम्प

First Published on: November 15, 2019 4:37 PM
Exit mobile version