चंद्रावर सापडलं पाणी; नासाने केला दावा

चंद्रावर सापडलं पाणी; नासाने केला दावा

चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा आढळून आल्याची माहिती NASA ने दिली आहे. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असं नासाने म्हटलं आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या चंद्रांच्या पृष्ठभागावर पाण्याचे साठे आढळून आले आहेत. त्यामुळे चंद्राच्या उर्वरित पृष्ठभागावरही विखुरलेल्या स्वरुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली असून चंद्रावर पाणी सापडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे.

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचं अस्तित्व मर्यादित नसल्याचं नासाने म्हटलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आलं आहे.

आम्हाला सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी उपलब्ध असल्याचे संकेत मिळाले आहेत. हा शोध लागल्यामुळे चंद्राविषयी आपल्याकडे आजपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीला नवं आव्हान मिळालं आहे. तसंच अंतराळ संशोधनातील कुतूहल आणखीनच वाढल्याचं मत ‘नासा’चे शास्त्रज्ञ पॉल हर्टझ यांनी मांडलं.

First Published on: October 26, 2020 11:11 PM
Exit mobile version