आम्ही रेल्वेचं खासगीकरण केलेलं नाही – पीयूष गोयल

आम्ही रेल्वेचं खासगीकरण केलेलं नाही – पीयूष गोयल

रेल्वेच्या खासगीकरणावर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही रेल्वेचं खासगीकरण केलेलं नाही, असं पियुष गोयल म्हणाले. गरीबांसाठी आधीच गाड्या आहेत. विमान वाहतूकीमध्ये खासगी कंपन्या आल्यानंतर भाडं कमी झालं आहे. आता गरीबही विमाने प्रवास करु शकतात. ते म्हणाले की २००४ आणि २०१४ च्या प्रत्येक अर्थसंकल्पात रेल्वेसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा (पीपीपी) उल्लेख होता. सरकार खासगी क्षेत्राच्या अग्रगण्य भूमिकेस मान्यता देईल, असं २००५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात पी. ​​चिदंबरम म्हणाले होते.

कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, कॉंग्रेस दिशाहीन झाली आहे आणि पूर्वी त्यांची धोरणे काय होती हे त्यांना माहिती नाही आहे. आधुनिक गाड्या सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत जगभरातील लोकांची सेवा करीत आहेत, आम्हाला अशा गाड्या भारतातही हव्या आहेत. ते म्हणाले की लोकांना चांगली सेवा, आरामदायक प्रवास आणि रेल्वेचा विस्तार व्हावा अशी त्यांची इच्छा नाही. देशाच्या प्रगतीच्या मार्गावर रेल्वे हे विकासाचं इंजिन व्हावं अशी त्यांची इच्छा नाही. कॉंग्रेस अध्यक्षा आणि त्यांच्या मुलाच्या या विचार दृष्टीचा मी निषेध करतो. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ज्या प्रमाणात देश आणि गरिबांची सेवा केली आहे, ते कुणी केलं असं मला वाटत नाही. मला वाटतं की स्वातंत्र्यानंतर हे पहिलं सरकार आहे जे गरिबांसाठी बऱ्याच योजना घेऊन आलं आहे.


हेही वाचा – टिकटॉकच्या बंदीनंतर ‘मित्रों’ सरस; दिवसाला होताहेत १० लाख व्हिडीओ अपलोड


 

First Published on: July 8, 2020 11:38 PM
Exit mobile version