काँग्रेसला मलाई तर आम्हाला देशाची भलाई हवी: मोदी

काँग्रेसला मलाई तर आम्हाला देशाची भलाई हवी: मोदी

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या देशभरात सभा होणार असून अरुणाचल प्रदेशच्या आलो मधील सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसला केवळ मलाई हवी आहे, तर आम्हाला देशाची भलाई हवी आहे, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रसने ७० वर्षांच्या कार्यकाळात केवळ देशाचे शोषण केल असून, एखाद्या योजनमधून जनतेच्या भलाई पेक्षा भ्रष्टाचार करुन पैशांची किती मलाई मिळेल याकडेच त्यांनी लक्ष दिल. या उलट भाजप सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात लोकांच्या भलाईचाच विचार केला असे त्यांनी सांगितले.

अरुणाचल प्रदेश रेल्वेच्या नकाशावर

अरुणाचल प्रदेशला मजबुत आणि आधुनिक इंफ्रास्ट्रक्चरची गरज असल्याचे जाणकारांनी सांगितले होते, मात्र अरुणाचल प्रदेशच्या मोठ्या घराण्यांचे काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांशी संबंध असल्याने त्यांनी केवळ स्वताच्या फायद्याचा विचार केला आणि अरुणाचल प्रदेशचा विकास रोखला. मात्र ७० वर्षांनंतर देशाने भाजपला संधी दिल्याने देशाच्या रेल्वेच्या नकाशावर या चैकीदाराला अरुणाचल प्रदेशाचे अस्तत्व निर्माण करता आले असे लोकांना संबोधीत करताना मोदी म्हणाले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींनी लोकांना पुन्हा एकदा भाजपला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे अवाहन केले.

सरकारच्या कामकाजाचा पाढा

विरोधकांवर टीका करतांना मोदी भाजप सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा वाचायला विसरले नाही. भारताने केलेल्या एअर स्ट्राइक, वैज्ञानिकांनी केलेल्या कामगिरवर देखील विरोधकांनी टीका केली. देशाचा विकासात विरोधक अडथळा आणतात. देशाची प्रगती आणि चांगली काम देखील विरोधकांना बघवत नाही. तेंव्हा मालाई खाणाऱ्यांना नाही तर देशाच्या भल्याचा विचार करणाऱ्यांना निवडून आणा, मला केंद्रात आणि पेमा खांडूला पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणून आणा असे मोदी म्हणाले.

 

 

First Published on: March 30, 2019 4:41 PM
Exit mobile version