एक टक्का श्रीमंताची संपत्ती ७० टक्के जनतेच्या संपत्तीहून चारपट अधिक

एक टक्का श्रीमंताची संपत्ती ७० टक्के जनतेच्या संपत्तीहून चारपट अधिक

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात विषमता अनेक प्रकारच्या आहेत. त्यातील गरिब-श्रीमंत भेद हा तर पुर्वीपासूनच चालत आलेला आहे. दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेचे ५० वी वार्षिक सभा सुरु आहे. या वार्षिक सभेत एक धक्कादायक अहवाल मांडण्यात आला आहे. भारतातील एक टक्के श्रीमंत लोकांकडे ७० टक्के लोकांच्या संपत्तीहून चारपट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे. भारतातील सर्व अब्जाधीशांती संपत्ती ही देशाच्या वार्षिक बजेटपेक्षाही अधिक असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे.

राईट्स ग्रुप ओक्सफाम या संस्थेने ‘टाइम टू केअर’ या नावाने सदर अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच जगातील २ हजार १५३ अब्जाधीशांची संपत्ती ही पृथ्वीवरील ६० टक्के लोकांच्या संपत्तीऐवढी असल्याचेही सांगण्यात आले आहे. मागच्या दशकात अब्जाधीशांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली आहे. तसेच त्यांच्या एकत्रित संपत्तीत मागच्या वर्षी घसरण झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. “श्रीमंत आणि गरिब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विषमतेला दूर करणारे धोरण मुद्दामहून राबविले गेले पाहीजेत. काही सरकार याबाबत पावले उचलत आहेत.”, असे ओक्सफामचे भारतातील सीईओ अमिताभ बेहर यांनी सांगितले आहे. बेहर यावर्षी ओक्सफाचे जागतिक अर्थ परिषदेत नेतृत्व करत आहेत.

ओक्सफाच्या अहवालानुसार, भारतातील ६३ भारतीय अब्जाधीशांची संपत्ती ही भारतीय अर्थसंकल्पापेक्षाही जास्त असल्याचे समोर आले आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये २४ लाख ४२ हजार २०० कोटींचे भारतीय अर्थव्यवस्था होती. भारतातील एका महिला मजूर २२ हजार २७७ वर्षांमध्ये जेवढे पैसे कमवते, तेवढे पैसे एका तंत्रज्ञानाच्या कंपनीचा सीईओ एका वर्षात कमावतो. एका पुरुष मजूराच्या वार्षिक कमाईपेक्षा जास्त पैसे एक सीईओ १० मिनिटांत कमावतो, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जगातील प्रत्येक खंडात सामाजिक अशांतते बरे वाईट परिणाम दिसत आहेत. भ्रष्टाचार, घटनात्मक पेचप्रसंग आणि आवश्य वस्तू आणि सेवांचे किमती वाढल्यामुळे जगभरात विषमता वाढीस लागली आहे. लिंग आणि उत्पन्नाच्या विषमतेबद्दल जागतिक अर्थ परिषदेत यावेळी पाच दिवस चर्चा करण्यात येणार आहे. सोमवार पासून पाच दिवसांसाठी ही अर्थ परिषद दावोस येथे सुरु झाली आहे.

First Published on: January 20, 2020 1:22 PM
Exit mobile version