Weather Update : आजपासून हवामानात बदल; उष्णतेपासून मिळणार दिलासा, ‘या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update : आजपासून हवामानात बदल; उष्णतेपासून मिळणार दिलासा, ‘या’ भागात पावसाची शक्यता

Weather Update : आजपासून हवामानात बदल; उष्णतेपासून मिळणार दिलासा, या भागात पावसाची शक्यता

कडक उन्हापासून नागरिकांची आता सुटका होणार आहे. कारण आजपासून देशातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सोमवार म्हणजे आजपासून पुढील काही दिवस बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे उत्तर भारताला दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस दिल्ली. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह अचानक वेगाने वारे वाहू शकतात. ज्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितासपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर देशाच्या उर्वरित उत्तर -पश्चिम भागातही असेच हवामान दिसून येईल. यामुळे गंगेच्या मैदानातही काही दिवस उष्णतेच्या लाटेपासून सुटका होईल.

हवामानातील या बदलांमुळे उत्तर -पश्चिम भागात येत्या दिवसांत कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारताव्यतिरिक्त गुजरात, महाराष्ट्रात पारा 2 ते 3 अंशांनी खाली जाऊ शकतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागर आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील पाच दिवस झारंखंड, बंगाल आणि ओडिसामध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.. यानंतर 3 आणि 4 मे रोजी काही भागात जोरदार वाऱ्यासह चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर गारपिटही पडू शकते. तसेच जोरदार वादळाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस ईशान्य भारत आणि उप-हिमालयी बंगाल, सिक्कीममध्ये वादळ आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. दुसरीकडे, दक्षिण अंदमान समुद्रात चक्री वाऱ्यांची प्रणाली तयार होत आहे, त्यामुळे जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

यंदा मे महिना उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक मानला जातो. या वर्षीचा एप्रिल महिना उत्तर पश्चिम आणि मध्य भारतासाठी गेल्या १२२ वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे. पावसानेही यावेळी उदासीनता दाखवली आहे. 1 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान, संपूर्ण देशात 32% आणि वायव्य भारतात 86% पर्यंत पावसाची तूट नोंदवली गेली आहे. मात्र आता मान्सूनपूर्व हालचालींमुळे त्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


Pm Modi Visit Europe : पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर; युक्रेन-रशिया युद्धावर होणार चर्चा


First Published on: May 2, 2022 8:44 AM
Exit mobile version