धक्कादायक! घरातून येत होता दुर्गंध; लोकं घरात गेले आणि पाहिलं तर…

धक्कादायक! घरातून येत होता दुर्गंध; लोकं घरात गेले आणि पाहिलं तर…

ठाण्यात एसटीपीच्या टाकी पडून तरुणाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील हावडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून येणाऱ्या दुर्गंधीबद्दल आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जेव्हा पोलिसांना कळवले, तेव्हा एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ज्याने सर्वांनाच चकित केले. या प्रकाराचा तपास करत असताना पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना दोन मृतदेहाजवळ एक महिला बसलेली दिसली. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दरवाजा तोडला आणि भावंडांच्या मृतदेहांसह बसलेल्या या लहान बहिणीला घरातून बाहेर काढले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बेलूरमधील लालाबाबू सायर रोड येथील आहे.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी घरातून दुर्गंध येत असल्याचे पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. वय वर्षे ८५ असणाऱ्या मनोरंजन सेन आणि वय वर्षे ७५ प्रतिमा सेन अशी मृतांची नावे आहेत. त्याचवेळी दोन्ही भावंडांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या महिलेचे नाव अनिता सेन असून त्याचे वय ६५ वर्षे आहे. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी सांगितले की दोन-तीन दिवसांपूर्वीची ही घटना होती. ही घटना कशी घडली आहे आणि या घटनेनंतर अनिताने तिच्या कुटुंबियांना किंवा शेजाऱ्यांना याबद्दल का सांगितले नाही. याची चौकशी केली जात आहे. मात्र, सध्या अनिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर काही लोकांचे म्हणणे आहे की, घराच्या दरवाज्याला आणि खिडक्यांना प्लास्टिक लावून आतून बंदिस्त करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. तर या मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच कळू शकेल असे सांगितले जात आहे.


हाथरस प्रकरण ताजे असताना मध्यप्रदेशात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार
First Published on: October 1, 2020 11:11 AM
Exit mobile version