Railway Recruitment 2021: दहावी पास आहात? रेल्वेत नोकरीची संधी; ७५ हजारांपर्यंत मिळणार पगार

Railway Recruitment 2021: दहावी पास आहात? रेल्वेत नोकरीची संधी; ७५ हजारांपर्यंत मिळणार पगार

कोरोनादरम्यान पश्चिम रेल्वेने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम रेल्वेने बर्‍याच पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अंतर्गत सीएमपी, नर्सिंग सिस्टर आणि हॉस्पिटल अटेंडंटची पदे भरली जाणार आहे. पश्चिम रेल्वे पॅरामेडिकल भरती २०२१ साठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार आज म्हणजेच ११ मे २०२१ पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन व्हिडिओ मुलाखतीतून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

पश्चिम रेल्वे पॅरामेडिकल भरतीसाठी उमेदवाराला ७ मे २०२१ पासून अर्ज करता येणार असून या पदाकरता अर्जा करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२१ पर्यंतच असणार आहे. या अर्जामधून निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची मुलाखत व्हिडिओद्वारे १३ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे पॅरामेडिकल भरतीसाठी सीएमपी पदाकरता ९ जागा, नर्सिंग सिस्टर पदाकरता ८ जागा, हॉस्पिटल अटेंडंट पदाकरता १० जागा असून इच्छुक उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.

पश्चिम रेल्वे पॅरामेडिकल भरतीसाठी पात्रता 

सीएमपी या पदावर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एमबीबीएस (एमसीआय मान्यता प्राप्त) पदवी असणे आवश्यक आहे. नर्सिंग सिस्टर या पदाकरता नोंदणीकृत नर्सचे प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे. तसेच, ३ वर्षांचा कोर्स किंवा सामान्य नर्सिंगमध्ये बी.एससी असणे आवश्यक आहे. यासह हॉस्पिटल अटेंडंट या पदासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराकडे मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

पश्चिम रेल्वे पॅरामेडिकल भरती २०२१ साठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सीएमपी या पदासाठी उमेदवाराचे वय ५३ वर्षे, नर्सिंग सिस्टरसाठी १८ ते ३३ वर्षे आणि हॉस्पिटल अटेंडंटसाठी देखील १८ ते ३३ वर्षे वय निश्चित करण्यात आले आहे.

असे असणार वेतण

First Published on: May 11, 2021 2:42 PM
Exit mobile version