‘ते ४५ मिनिटं खूपच मोठे होते’; WhatsApp ने ट्वीट करून युजर्सचे मानले आभार

‘ते ४५ मिनिटं खूपच मोठे होते’; WhatsApp ने ट्वीट करून युजर्सचे मानले आभार

भारतासह जगातील सर्व देशांमध्ये शुक्रवारी रात्री लोकप्रिय आणि सर्वाधिक युजर्स असणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅप हे डाऊन झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअ‍ॅपसह इतर काही सोशल मीडिया मेसेजिंग अॅप्लिकेशन देखील ठप्प झाले होते. व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर डाऊन असल्याने देशभरातील युजर्सना त्याच्या फटका बसल्याने युजर्स हैराण झाले होते. देशात शुक्रवारी रात्री साधारण ११ वाजेच्या दरम्यान ठप्प झालेलं व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा सुरू होण्यासाठी साधारण अर्ध्यातासाचा अवधी लागला. या अर्ध्या तासानंतर रात्री १२ वाजेदरम्यान व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग पुन्हा सुरळीत झाल्याचे दिसले.

साधारण तब्बल ४५ मिनिटांसाठी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने एक निवेदन ट्विटरद्वारे जारी केले. या निवेदनात कंपनीने त्यांच्या युजर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. ‘तुमच्यातील संयमाबद्दल धन्यवाद, ४५ मिनिटांचा हा वेळ खूप मोठा होता. मात्र आता आम्ही पुन्हा आलो आहोत. असे असले तरी व्हॉट्सअॅप डाऊन होण्याचे कारण नेमके काय होते हे कंपनीला अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, शुक्रवारी रात्री जगभरातील सर्व युजर्सचे कामकाज व्हॉट्सअॅपने थांबवले. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होत असताना इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजरही डाऊन असल्याचे दिसून आले. यामुळे युजर्समध्ये अधिक नाराजी दिसली. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले असताना केवळ मेसेज जाणे-येणे थांबले नाही, तर व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हरशी कनेक्ट होतानाही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. व्हॉट्सअॅप डाऊन झाले असताना सिग्नल अॅप्लिकेशनवर अनेक युजर्स वळल्याचे दिसून आले. दरम्यान सिग्नल अॅप्लिकेशनच्या युजर्समध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी कंपनीने ट्विट करत युजर्सची संख्या अचानक वाढली असल्याची माहिती दिली.


First Published on: March 20, 2021 10:46 AM
Exit mobile version