‘तुम्ही चौकीदार असाल तर महिला सुरक्षित नाहीत’ – रेणुका शहाणे

‘तुम्ही चौकीदार असाल तर महिला सुरक्षित नाहीत’ – रेणुका शहाणे

रेणूका शहाणे आणि एम जे अकबर

लोकसभा निवडणूक २०१९ च्या आधी सर्व राजकीय पक्ष सोशल मीडियावर पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. शनिवारी भाजपने ट्विटरवर एक नविन मोहिम सुरु केली. ‘मैं भी चौकीदार’ हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विटरवर भाजपने मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर आपले नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले आहे. मोदींशिवाय भाजपमधील नेत्यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावापुढे चौकीदार लिहील्याचे दिसले. भाजपचे नेते एम जे अकबर हे देखील या मोहिमेत सहभागी होत त्यांनी यावर ट्विट केले आहे. या ट्विटनंतर बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने असे उत्तर दिले की, त्यावरुन एम जे अकबर यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपचे नेते एम जे अकबर यांनी आरल्या ट्विटर अकाऊंटवर असे ट्वि केले आहे की, ‘मला ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे खूप गर्व होत आहे. एक नागरिक होण्याच्या नात्याने मी भारतावर प्रेम करतो. मी भ्रष्टाचार, अस्वच्छता, गरिबी आणि दहशतवादाला हटवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि एक नविन भारत बनवण्यासाठी मदत करेल. जो मजबूत, सुरक्षित आणि समृध्द असेल.’ एम जे अकबर यांच्या या ट्विटला बॉलिवूडची अभिनेत्री रेणूका शहाणे हिने उत्तर दिले आहे. त्यावरुन एम जे अकबर यांचे ट्विट सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने एम जे अकबर यांना दिलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘जर तुम्ही पण चौकीदार असाल तर कोणतीच महिला सुरक्षित नाही’ रेणुका शहाणेने हॅशटॅग ‘बेशर्मी की हद’ और ‘इंडिया मीटू’ला टॅक केले आहे. #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा आरोप लावल्यानंतर भाजप नेता एम जे अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अकबर यांच्यावर जवळपास २० महिला पत्रकारांनी लैगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. अकबर यांनी राजीनामा द्यावा यासाठी सर्वच विरोध पक्षांनी जोरदार मागणी केली होती.

दरम्यान, एका ट्विटर युजरनं तुम्ही देखील अभिमानानं ‘मै भी चौकीदार’ म्हणा असा सल्ला रेणुका शहाणे यांना दिला, यावर रेणुका यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘कुठल्याही हॅशटॅगमुळे मी माझं नाव बदलणार नाही किंवा तुम्हाला एखादी गोष्ट ऐकायची आहे म्हणून मी ती म्हणणार नाही. माझ्या बुद्धीचा वापर करून जर काही म्हणायचं झालंच तर मी एक जागरूक आई, अभिनेत्री आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे असं अभिमानानं म्हणेल. तुमचं चालू द्या’ असं उत्तर रेणूका शहाणे यांनी दिलं आहे.

First Published on: March 17, 2019 5:20 PM
Exit mobile version