मध्य प्रदेशाचे माफ कोणाच्या पारड्यात?

मध्य प्रदेशाचे माफ कोणाच्या पारड्यात?

महाराष्ट्राच्या बाजूचे अजून एक महत्त्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात सलग तीन टर्म भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला या राज्यात फटका बसला. येथील सत्ता भाजपच्या हातातून सुटली. काँग्रेस मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत आली. असे जरी असले तरी भाजपची सत्ता काही हाताच्या मोजक्या जागांनी गेली, तर काँग्रेसला येथे जेमतेम सत्ता राखता आली. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काय होणार याची चिंता सर्वांनाच लागून आहे. मध्य प्रदेशात भाजपची सर्व भिस्त माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर आहे, तर काँग्रेस मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेस नेते ज्योतिरादीत्य शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. या राज्यांत भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही संधी असल्यामुळे येथील लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर होणार हे निश्चित आहे. त्यातही विधानसभेत काँग्रेसने दिलेली सर्वच आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्याचा भाजप फायदा उठवणार. या राज्यात शेतकर्‍यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने आगामी लोकसभा निवडणुका गाजणार यात शंका नाही.

लोकसभेच्या २९ जागा
मध्य प्रदेशात लोकसभेचे २९ मतदारसंघ आहेत. १ -सिद्धी, २- शाहडोल, ३ – जबलपूर, ४- मंडला, ५ -बागभट, ६-चिंडवारा, ७- टिकमगड, ८- दामोह, ९-खजुराहो, १० – सटणा, ११- रेवा, १२ – होशंगाबाद, १३ – बेतुल, १४ – मोरेना, १५ -भिंड, १६ -ग्वाल्हेर, १७ -गुना, १८-सागर, १९ – विदिशा, २० – भोपाळ, २१ – राजगड, २२ – देवास, २३ – उज्जेन, २४- मंडसोर, २५ – रतलाम, २६- धार, २७- इंदूर, २८- खारगोना, २९ -खांडवा.

मध्य प्रदेश भाजपचा गड
मध्य प्रदेश हा गुजरातप्रमाणेच भाजपचा सशक्त गड ठरला आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशातील २९ मतदारसंघांपैकी २७ मतदारसंघात विजय मिळवला होता, तर काँग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या होत्या, तर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेशातून १६ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळला होता.

राज्यात ५.०४ कोटी मतदार
राजस्थान एकूण ५ कोटी ४० हजार मतदार आहेत. त्यातील १५,७८,१६७ मतदार हे यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. हे मतदार १८ ते १९ वर्षे वयोगटातील आहेत. राज्यात ५,०३,९४,०८६ मतदारांपैकी २,४०,७७,७१९ महिला मतदार आहेत. तर १,४१० मतदार हे किन्नर आहेत.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) शेतकर्‍यांची कर्जमाफी
२) राज्यातील सिंचन व्यवस्था
३) बेरोजगारी आणि परप्रांतिय
४) मध्य प्रदेशाचा विकास

मध्य प्रदेशातील लोकसंख्या
२०११ सालच्या जनगणनेनुसार, मध्य प्रदेशात ९०.९ टक्के हिंदू, ६.६ टक्के मुस्लिम, ०.८ टक्के जैन, ०.३ टक्के बुद्धीस्ट, ०.३ टक्के ख्रिश्चन आणि ०.२ टक्के शीख आहेत. मध्य प्रदेशात अनुसूचित जाती आणि जमातींची संख्या जास्त आहे. गोंड, भिल, बैगा, कोरकु, भाडीया, हलबा, कौल, मारिया, मट्टो या अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या मध्य प्रदेशात जास्त आहेत. या जमाती शहारीया, धार, झबुआ, मांडला जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. मध्य प्रदेशात आदिवासींची संख्या ७३.३४ दक्षलक्ष इतकी आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकारण हे आदिवासी आणि अनुसूचित जाती, जमातींच्या भोवती फिरणारे असते.

First Published on: March 27, 2019 4:13 AM
Exit mobile version