करोना विषाणू हवेतून पसरतो; WHO चा नवा निष्कर्ष

करोना विषाणू हवेतून पसरतो;  WHO चा नवा निष्कर्ष

प्रातिनिधिक छायाचित्र

करोनाचा विषाणू हवेत काही काळ जिवंत राहतो, असे एका संशोधनात उघड झाले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने डॉक्टरांसह सर्व मेडिकल स्टाफला काळजी घेण्याचे निर्देश देण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की करोना विषाणू हा ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतो. करोनाग्रस्त रुग्णाच्या शिंकेतून, थुंकीतून ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतो. मात्र आता तो हवेत जिवंत राहतो हेही उघड झाले आहे. सीएनबीसी या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य डॉ. मारीया करखोव्ह यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, “आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे विषाणू हवेत काही काळ जिवंत राहत असल्याचे समोर आले आहे.” जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत. कोविड १९ हा विषाणू वातावरणातील आद्रता, तापमान आणि सुर्याच्या तीष्ण किरणांपासून कसा प्रभावित होतो, याचा अभ्यास करत आहेत. तसेच स्टिल किंवा इतर गोष्टींवर हा कितीकाळ जिवंत राहू शकतो? याचाही खोलात जाऊन अभ्यास केला जात आहे.

याआधी हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात होता. याचे ड्रॉपलेट्स शिंक किंवा थुंकीतून पसरत होते. तसेच नव्या अभ्यासानुसार याचे काही कण हवेत देखील पसरतात. तसेच उष्णता आणि वातावरणातील फरकानुसार त्यांचे आर्युमान ठरते.

त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच त्यांनी एन ९५ मास्क वापरावा असा सल्ला दिला आहे.

First Published on: March 23, 2020 11:22 PM
Exit mobile version