जगात कोरोना महामारीची धोकादायक स्थिती; जगातील मृतांची संख्या ४० लाखांच्या पार – WHO

जगात कोरोना महामारीची धोकादायक स्थिती; जगातील मृतांची संख्या ४० लाखांच्या पार – WHO

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रसस

जगभरातील कोरोना महामारीमुळे आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या ४० लाखांवर गेली आहे. बुधवारी जगातील सर्व देशांचा एकत्रित कोरोना मृतांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली. आतापर्यंत जगभरात १८ कोटीहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जरी भारतासह इतर देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरीही जगभरात कोरोनाची एक कोटीहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत, ज्यामुळे देशाची चिंता कायम आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाने ४० लाख मृत्यू झाल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रासास यांनी बुधवारी असे म्हटले की, सध्या जगात कोरोना महामारीची धोकादायक स्थिती आहे. यासह जगात कोरोनामुळे आतापर्यंत ४० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, काही देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लसीकरण वेगाने केले गेले, तेथे कोरोना महामारी संपली असे लोकांना वाटू लागले आहे. यासह, कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये पुन्हा कोरोनाची रूग्णे वाढू लागली आहेत. बुधवारी कोरोनावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना टेड्रोस असे म्हणाले की, जग कोरोना या साथीच्या रोगाच्या एका धोकादायक टप्प्यावर आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अडनॉम घेबेरियसस म्हणाले, जग कोरोना महामारीच्या धोक्यात आहे. मृत्यूच्या वास्तविक संख्येपेक्षा ४० लाखांचा आकडा कमी आहे. यासह त्यांनी श्रीमंत देशांवर लस आणि संरक्षक साधणांचा साठा केल्याबद्दल देखील टीका केली. निर्बंध सुलभ करणाऱ्या देशांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत ते म्हणाले, कोरोना महामारी आधीच संपली आहे असे हे देश वागत आहेत. वेगाने वाढणार्‍या व्हायरस व्हेरिएंटमुळे आणि कमी लसीकरणामुळे जगातील कानाकोपऱ्यातील अनेक देशांमध्ये रूग्ण व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत ऑक्सिजनचा अभाव, उपचारांच्या अपुऱ्या सुविधांमुळे मृत्यूची लाट अद्याप असल्याचे टेड्रॉस अडनॉम घेबेरियसस यांनी सांगितले.


India Corona Update: गेल्या २४ तासात मृतांच्या आकड्यात घट; ४५,८९२ नव्या रूग्णांचे निदान, ८१७ जणांचा मृत्यू
First Published on: July 8, 2021 11:29 AM
Exit mobile version