Coronavirus: आफ्रिकन देशांमध्ये सुविधांचा अभाव; १० लाख लोकांसाठी फक्त ५ बेड

Coronavirus: आफ्रिकन देशांमध्ये सुविधांचा अभाव; १० लाख लोकांसाठी फक्त ५ बेड

कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाल्यापासून, आफ्रिका खंडातील रूग्णालयांमध्ये अतिदक्षता बेड आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. गुरुवारी, जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, आफ्रिकेतील ४३ देशांमध्ये रूग्णालयात ५००० पेक्षा कमी इन्टेन्सिव्ह केअर बेड आहेत. आफ्रिकन देशांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार ज्या देशांमध्ये हा संसर्ग पसरला आहे, तेथे दहा लाख लोकांसाठी फक्त पाच बेड आहेत, तर तुलनेत युरोपियन देशात दहा लाख लोकांना ४००० बेड्स आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं.


हेही वाचा – कोरोनासाठी महापालिकेच्या रुग्णालयात ११४ वॉर्डबॉयची भरती


कोविड -१९ च्या उपचारासाठी बर्‍याचदा इन्टेन्सिव्ह केअर युनिटची आवश्यकता असते. जिथे रुग्णांना व्हेंटिलेटरच्या मदतीने सहजपणे श्वास घेता येतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, आफ्रिकेतील ४१ देशांच्या रुग्णालयात केवळ २००० व्हेंटिलेटर्स आहेत. आफ्रिकेतील जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मातशिदिसो मोइती म्हणाले, “आफ्रिकेत कोविड -१९चा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये उपचाराच्या सुविधांची मोठी कमतरता आहे.”

आफ्रिकेत आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या ११,५०० आहे, तर ५७० लोकांचा मृत्यूही झाला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत आतापर्यंत कोरोना संसर्गाची घटना कमी आहे. अनेक देशांमध्ये, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

 

First Published on: April 10, 2020 4:02 PM
Exit mobile version