ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबवण्याच्या निर्णयावर WHO ‘ही’ प्रतिक्रिया

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबवण्याच्या निर्णयावर WHO ‘ही’ प्रतिक्रिया

कोरोना लस

सध्या कोरोना विषाणूच्या लसीच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेली ऑक्सफर्ड लसीचा वेग अचानक थांबला आहे. एका व्यक्तीवर याचे साइड इफेक्ट दिसल्यानंतर ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी काही वेळासाठी थांबविली गेली आहे. आता याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने निवेदन जारी केले आहे. जागातिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ‘कोणत्याही परिस्थितीत लसीच्या सुरक्षिततेबाबत कोणताही करार होऊ नये.’

जागातिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी रायटर्सशी बातचित करताना म्हणाल्या की, ‘कोरोनाची पहिली आणि आवश्यक प्राथमिकता ही तिची सुरक्षा असली पाहिजे. आम्ही लस लवकर आणण्याविषयी बोलतो पण याचा अर्थ असा नाही की, तिच्या सुरक्षिततेवर कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा कपात केली पाहिजे. लस तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करणे आवश्यक आहे.’

दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेन्काद्वारे विकसित केलेल्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अमेरिकेत थांबवली आहे. स्टेट न्यूजच्या वृत्तानुसार, ब्रिटेनमध्ये ही लस घेणाऱ्या स्वयंसेवकाच्या आरोग्यावर गंभीर Reaction दिसल्यानंतर तिसऱ्या टप्पातील चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्काचे प्रवक्ते म्हणाले की, ‘कोणत्याही चाचणीत अशा चौकशी करण्यासाठी ही नेहमीच कारवाई केली जाते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी प्रामाणिकपणाने पूर्ण केली पाहिजे.’


हेही वाचा – वाईट बातमी: ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी!


 

First Published on: September 10, 2020 8:40 AM
Exit mobile version