गोव्यात कोरोना उपचारांसाठी Ivermectin औषधाचा वापर, परंतु WHO चा वापराला विरोध

गोव्यात कोरोना उपचारांसाठी Ivermectin औषधाचा वापर, परंतु WHO चा वापराला विरोध

गोव्यात कोरोना उपचारांसाठी Ivermectin औषधाचा वापर, परंतु WHO ने दर्शवला वापराला विरोध

देशात कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांचा वापर करत उपचार केले जात आहेत. यात सर्वाधित गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आले ते रेमडेसिवीर औषध. पण या औषधानंतर आता असे एक औषध चर्चेत आले आहे जे कोरोनाला संपवू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे. या औषधाचे नाव इव्हर्मेक्टिन (Ivermectin) असे आहे. दरम्यान गोवा सरकारनेही सोमवारी कोविड-19 (Covid-19) वरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन (Ivermectin)औषधाचा वापराला परवानगी दिली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन (Ivermectin) औषधांचा वापरविरोधात गंभीर इशारा दिला आहे.

देशात कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी औषधांचा वापराविरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत सांगताना डॉ. स्वामीनाथन यांनी ट्विट केले की, कोरोनाबाधित रुग्णांवर कोणतेही औषध वापरताना त्याची सुरक्षा आणि कार्यक्षमता तपासणे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे WHO सुद्धा कोरोनाविरुद्ध औषधांचा वापर करण्याआधी क्लिनिकल ट्रायल करण्याची शिफारस करते.

दरम्यान गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोरोनामुळे होणार मृत्यूदर कमी करण्यासाठी १८ वर्षावरील सर्व नागरिकांना इव्हर्मेक्टिन (Ivermectin)औषधाच्या 5 गोळ्या घेण्याची शिफारस केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, इव्हर्मेक्टिन (Ivermectin) औषधाची १२ मिलीग्रॅमची टॅबलेट राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध होईल. ज्यांना कोरोनाची लक्षणं असतील किंवा नसतील अशा सर्व नागरिकांनी ते घ्यावं. आम्ही योग्य ती काळजी घेण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपचार (Precuationary Treatment) देत आहोत. इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या १८ वर्षांवरील सर्व रुग्णांना शासकीय आरोग्य केंद्रावर दिल्या जातील. लोकसंख्येच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना हे औषध उपलब्ध करून दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. ५ दिवसांच्या कालावधीत रुग्णांना इव्हर्मेक्टिन देत त्यांच्यावर उपचार केले जातील.

दरम्यान, गोवा सरकारच्या इव्हर्मेक्टिन (Ivermectin) औषध वापराचा घोषणेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. कारण यावर कॉंग्रेसने इव्हर्मेक्टिन औषधाची शिफारस केंद्राने मंजूर केली आहे की डब्ल्यूएचओ असा प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (IMA) गोवा अध्यायचे प्रमुख डॉ. विनायक बुवाजी म्हणाले की, गोळ्याचा 5 दिवसांचा कोर्स परिणामकारक होणार नाही, त्यामुळे इव्हर्मेक्टिन हे औषध सर्व देशभरातून कोरोना संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत सुरु ठेवावा.


 

First Published on: May 11, 2021 3:11 PM
Exit mobile version