विराट आणि स्मिथमध्ये कोण आहे बेस्ट? खेळाडूंनी दिली मजेदार उत्तरे

विराट आणि स्मिथमध्ये कोण आहे बेस्ट? खेळाडूंनी दिली मजेदार उत्तरे

विराट आणि स्मिथमध्ये कोण आहे बेस्ट, खेळाडूंनी दिली मजेदार उत्तर

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची बर्‍याचदा त्यांच्या उत्तम खेळीवरून तुलना केली जाते. दोघेही उत्तम खेळाडू आहेत, ते दोघेही त्यांच्या संघासाठी उत्कृष्ट धावा करतात यात शंकाच नाही. तरीही या दोघांविषयी अनेकजण आपली मतं मांडत असतात. यावर सचिन तेंडुलकरनेही आपले मत मांडले आहे. सचिन म्हणाला की, ” विराट आणि स्मिथ या दोघांची फलंदाजी करण्याची शैली मला आवडते. मात्र, या दोन फलंदाजांमधील तुलना करायला मला आवडणार नाही. या दोघांनाही मैदानावर फलंदाजी करताना पाहून मला फार आनंद होतो. त्यामुळे यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करायला नको”, असे स्पष्टपणे सचिनने सांगितले.

तसेच मी खेळलो तेव्हाही लोकांनी माझी आणि इतर काही खेळाडूंची तुलना केली मात्र खेळाडूला मोकळे खेळायला सोडले पाहिजे. विराट आणि स्मिथ हे दोघेही उत्तम फलंदाज आहेत आणि हे दोघेही आपल्या खेळातून क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. त्यामुळे, यांची तुलना होऊ शकत नाही असे मत सचिनने व्यक्त केले आहे. त्याचवेळी सचिनने कंगारू संघाचा फलंदाज मार्लनस लबूशेने याचेही कौतुक करत तो एक अतिशय हुशार फलंदाज असल्याचे सांगितले.

विराटची तुलना कोणत्याही खेळाडूशी होऊ शकत नाही – रोहित शर्मा

एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी स्मिथ आणि कोहलीमधील सर्वोत्कृष्ट कोण? असा प्रश्न टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माला विचारला. यावर रोहितने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचे बोलणे बंद केले आहे. रोहित म्हणाला विराट कोहलीची तुलना स्टीव्ह स्मिथशीच नाही तर कोणाशीही होऊ शकत नाही. ३० वर्षीय विराट कोहलीने आतापर्यंत ७७ टेस्ट, २२८ एकदिवसीय सामने आणि ६७ ट्वेंटी- ट्वेंटी सामने खेळले आहेत. याचवेळी ६,६१३ टेस्ट, १०,८६१ एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये २,२६४ असे त्याने रन काढले आहेत. तसेच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर ६६ शतके आहेत.
याच स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत ६४ टेस्ट मॅच, ११० एकदिवसीय आणि ३० ट्वेंटी- ट्वेंटी सामने खेळले आहेत. यामध्ये ६,१९९ टेस्ट, ३,५२२ एकदिवसीय आणि ट्वेंटी- ट्वेंटीमध्ये ४३१ रन काढले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथच्या नावावर  ६६ शतके आहेत. त्यामुळे, विराटची तुलना कोणत्याही खेळाडूशी होऊ शकत नाही असं स्पष्ट मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

First Published on: February 7, 2020 7:11 PM
Exit mobile version