कोरोनाबरोबर लढण्यासाठी अंडी खाणं का महत्वाचे ?

कोरोनाबरोबर लढण्यासाठी अंडी खाणं का महत्वाचे ?

NationalEggDay2021:अंडी खा तंदुरुस्त राहा,सुदृढ आरोग्याकरीता अंड्याचे महत्व जाणून घ्या

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ असे म्हटले जाते. म्हणूनच कोरोना रुग्ण व क्वारनटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे कोरोना व्हायरससारख्या महासंकटाचा सामना करण्यासाठी अंडीच का खायची असा प्रश्न रुग्णांना पडतो. पण आकाराने छोटसे दिसणार अंड बलवर्धक तर असतेच पण त्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचीही क्षमता असते. यामुळेच आहारात अंड्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच वजन वाढवण्यासाठीही काहीजण डाएटमध्ये अंड्याचे समावेश करतात. अंडी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढतेच शिवाय हाडही मजबूत होतात. यातील प्रोटीन्समुळे नखांची व केसाची वाढ होते.

सध्याच्या कोरोनाच्या संकटात रुग्णांबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांनीही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी जेवणात अंडी खाण्यास दिली जातात. कारण अंडी ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. अंड्यात कवचापासून ते पिवळ्या बलकापर्यंत व्हिटीमिन्सचा खजानाच असतो. यात अॅमिनो अॅसिड आणि अॅंटी ऑक्सिडेंट्सची प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. एका अंड्यात ८५ कॅलरीज म्हणजे ७ ग्रॅम प्रोटीन असते. व्हिटामिम ए, बी आणि के ही मुबलक प्रमाणात असते. तसेच रिबोफ्लेविन नावाचा पोषक घटकही अंड्यात असतो. ज्यामुळे शरीराची झालेली झीजही भरून निघते. यामुळे दिवसाला एक किंवा दोन अंडी खाल्ल्यास कुठल्याही संसर्गाशी लढण्यासाठी शरीर तयार होते. अंड्यातील पिवळ्या बलकात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. पण त्यातील प्रोटीन व सेलेनियम शरीरासाठी आवश्यक असते. यामुळे अंडी खाणे शरीरासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

First Published on: April 20, 2020 6:09 PM
Exit mobile version