Corona vaccine: कोरोनामुक्त झाल्यावर किती महिन्यात लस घ्यावी, जाणून घ्या

Corona vaccine: कोरोनामुक्त झाल्यावर किती महिन्यात लस घ्यावी, जाणून घ्या

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या दरम्यान, कोरोना रूग्णांना ही लस देण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुपतर्फे (NTAGI) भारतातील लसीकरण कालावधी संदर्भात अनेक शिफारसी देखील केल्या आहेत. यानुसार, कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या लोकांना कोरोनातून बरे झाल्यानंतर ६ महिन्यांनंतर कोरोना लस दिली गेली पाहिजे. या मागील कारण नेमके काय? वाचा सविस्तर

कोरोनावर मात केल्यानंतर, कोरोनाती लस घेताना कमीतकमी सहा महिन्यांचे अंतर ठेवले पाहिजे. यामागील कारण असे आहे की कोविड रुग्णाला रिकव्हरीदरम्यान नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती मिळते आणि त्यामध्ये तयार होणारे अँटीबॉडीज त्यांना संरक्षण देण्यास मदत करतात. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्यास किमान सहा महिने तरी आवश्यक असतात. त्यामुळे ६ महिन्यानंतर कोरोनाची लस दिली पाहिजे. जर कोरोना चाचणीकेल्यानतंर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास त्या व्यक्तीने कोरोनाची लस घेणं शक्यतो टाळले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत कोरोनाची लस घेऊ नये. जर कोरोना संसर्गादरम्यान कोरोनाची लस घेतली तर कोरोनाचा धोकाच वाढत नाही तर लसीकरण केंद्राला भेट दिल्याने आपण इतरांनाही हा संसर्ग पसरवू शकतात.

अमेरिकेच्या CDC च्या मते, जर कोणी कोरोना लसीचा एक डोसही घेतला नाही आणि ती व्यक्ती कोरोनाबाधित आहे, किंवा त्याला कोरोनाची लक्षण दिसली तर त्या व्यक्तीने कमीत कमी ९० दिवसांती प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. तर व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर गगनदीप कांग यांच्यामते. यूकेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, SARS-CoV-2 संसर्गापासून बनवलेल्या अँडीबॉडीज ८०% पर्यंत संरक्षण देतात. यासह संसर्ग झाल्यानंतर लस देण्यासाठी ६ महिने प्रतीक्षा करणे योग्य आहे.

 

First Published on: May 18, 2021 9:09 AM
Exit mobile version