शेतकऱ्यांवर रानडुक्करांचा हल्ला, गुप्तांग चावले

शेतकऱ्यांवर रानडुक्करांचा हल्ला, गुप्तांग चावले

शेतकऱ्यांवर रानडुक्करांचा हल्ला

शहाजहाँपूरच्या लालपूर परिसरात बुधवारी एका रानडुक्कराने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. त्यात दोन्ही शेतकरी जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे या रानडुक्कराने एका शेतकऱ्याचे गुप्तांग चावल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
राम मनोहर हा ५५ वर्षीय शेतकरी बुधवारी रात्री त्याच्या ऊसाच्या शेतात थांबला होता. शेताच्याकडेला तो लघुशंकेसाठी गेला असता अचानक त्याच्यावर एका रानडुक्कराने हल्ला केला. त्यामुळे जखमी झालेले राम खाली कोसळताच डुक्कराने पुन्हा त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या गुप्तांगाचा चावा घेतला. त्यामुळे राम जोरजोरात ओरडल्याने आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन रानडुक्कराला काठीने मारत हाकलून लावले. त्यानंतर जखमी राम यांना दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र राम यांना गुप्तांगाच्या ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

दरम्यान, रानडुक्करांच्या आणखी एका कळपाने एका ऊसाच्या शेतातून बाहेर येत राम सहाय नावाच्या गावकऱ्यावर हल्ला केला. शेतातील घराच्याबाहेर हा शेतकरी बसला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. इतर शेतकऱ्यांनी त्याची या हल्ल्यातून सुटका करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ’ऊसाच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर येत असतात. ते पिकांची नासधूस करतात. या रानडुक्करांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्यांना रोखणे कठीण झाले आहे. त्यांना जंगलात नेऊन सोडले पाहिजे,’ असे स्थानिक ग्रामस्थ बलहार सिंग यांनी सांगितले.

First Published on: May 19, 2018 6:03 AM
Exit mobile version