विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी वायुसेना प्रमुख बी.एस.धनोआ यांच्यासह मिग-२१ विमानामधून उड्डाण केलं. पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवरुन वर्धमान आणि धनोआ यांनी मिग-२१ मधून उड्डाण केलं. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्लानंतर भारताने पाकिस्तानच्या बालकोट येथे एअर स्ट्राइक केलं. या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने लढाऊ विमान भारतीय हद्दीत पाठवली. या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावण्यासाठी भारताने २७ फेब्रुवारीला सकाळी आकाशात संघर्ष करण्यात आला.

या संघर्षात मिग २१ घेऊन उड्डाण करणारे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ हे विमान पाडलं. पण यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यांचे मिग २१ हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. अभिनंदन हे पॅराशटूच्या साहाय्याने उतरताना पाकिस्तानमध्ये उतरले. यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने तुरूंगात टाकले. पण नंतर व्हिएन्ना कराराअंतर्गत पाकिस्तानला विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवावे लागले. पठाणकोट हा आयएएफच्या २६ स्क्वाड्रनचा बेस आहे. इंडियन एअर फोर्सकडे रशियन बनावटीच्या मिग-२१ ची पाच स्क्वाड्रन आहेत. त्यातील चार स्क्वाड्रनही मिग-२१ बायसनने सुसज्ज आहेत.


नक्की वाचावीणा मलिकने विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दल केलं वादग्रस्त टि्वट


एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ फायटर पायलट असून त्यांनी १९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी त्यांनी मिग-२१ मधून हल्ला करुन पाकिस्तानची रसद तोडली होती. २७ फेब्रुवारीला अभिनंदन व0र्धमान मिग-२१ मधून इजेक्ट झाल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना ते जखमी झाले होते. तब्बल सहा महिन्यानंतर दुखापतीवर मात करुन अभिनंदन कॉकपीटमध्ये परतले.

अभिनंदन यांना राजस्थानमधील आयएएफच्या तळावर तैनात करण्यात आले आहे. वर्धमान दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. केंद्र सरकारनं कठोर भूमिका घेतल्यामुळे १ मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची बिनशर्त सुटका केली होती. गेल्या २७ फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

First Published on: September 2, 2019 4:15 PM
Exit mobile version