देशात २४ तासांत रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ! आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ! आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा मृत्यू

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक २८ हजार ६३७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ४९ हजार ५५३ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार ६७४ झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात सर्वाधिक ८१३९ रुग्ण आढळले

राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सलग दोन दिवस कोरोनाबाधित रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. त्यातच शनिवारी कोरोना बळींनी १० हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात ८१३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६०० झाली आहे. तर राज्यात ९९ हजार २०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.


हेही वाचा – ना रुग्णवाहिका, ना बंद गाडी, थेट रिक्षातून आणला कोरोनाबाधिताचा मृतदेह!


First Published on: July 12, 2020 11:37 AM
Exit mobile version