सरकारचा पाठींबा काढणे आमदाराला पडले महागात, घरासह ३० ठिकाणी छापेमारी

सरकारचा पाठींबा काढणे आमदाराला पडले महागात, घरासह ३० ठिकाणी छापेमारी

सरकारचा पाठींबा काढणे आमदाराला पडले महागात, घरासह ३० ठिकाणी छापेमारी

हरयाणाचे अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी खट्टर सरकारला पाठिंबा दिला होता. खट्टर सरकारचा पाठींबा काढल्यामुळे बलराज कुंडू यांच्या घरासह ३० ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आमदार बलराज यांनी केंद्र सरकारविरोधी कृषी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनाही समर्थन दिले होते. तसेच कृषी कायद्यांना विरोध केला होता. आमदार बलराज यांनी मनोहर लाल खट्टर सरकारला पाठिंबा दिला होता परंतु सरकारविरोधात असलेल्या नाराजीमुळे कुंडू यांनी मागील वर्षी सरकारचा पाठींबा काढला होता. मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कुंडू यांनी केला आहे.

हरयाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारमध्ये मागील वर्षी सहकार मंत्री मनीष ग्रोव्हर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु खट्टर सरकारने ग्रोव्हर यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे सरकारचा पाठींबा काढला. भ्रष्ट लोकांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहे. असा आरोप आमदार कुंडू यांनी खट्टर सरकारवर केला आहे. तसेच त्यांनी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध केला आणि शेतकरी आंदोलनामध्येही सहभाग घेतला होता. कुंडू यांच्या घरासह ३० ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. यामध्ये त्यांचे घरे, दोन भाऊ, पत्नीचे माहेर आणि इतर नातेवाईकांच्या घरीही छापा टाकण्यात आला आहे.

खट्टर सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय कुंडू यांनी घेतलाय यामुळे खट्टर सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. वादग्रस्त शेतकरी कायद्यांवरुन उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालाही नाराज असल्यामुळे त्यांनीही सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला आहे.

First Published on: February 26, 2021 10:45 AM
Exit mobile version